वर्ध्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; फिट इंडिया अभियानात मारली बाजी; राज्यात दुसरे स्थान 

प्रभाकर कोळसे
Wednesday, 30 December 2020

मुलांच्या शारीरिक दृष्ट्‌या तंदुरुस्तीसाठी केंद्र सरकारने फिट इंडिया ही मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सुदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे,

नंदोरी (जि.वर्धा) : फिट इंडिया मोहिमेअंतर्गत यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची आँनलाइन नोंदणी 27 डिसेंबरपर्यंत करावयाची होती. यात वर्धा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील 71.03 शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून लातूर जिल्हा सर्वात शेवटी आहे.

हेही वाचा - Look Back 2020: वर्षभरात तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली उपराजधानी; अनैतिक संबंधामुळे...

मुलांच्या शारीरिक दृष्ट्‌या तंदुरुस्तीसाठी केंद्र सरकारने फिट इंडिया ही मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सुदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मुल्यमापन चाचण्या या शाळास्तरांवर घेऊन विद्यार्थ्यांचे मुल्यमापन विषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाईल अँपद्वारे भरण्यात येणार होती. 

याकरिता फिट इंडिया मोहिमेअंतर्गत सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या इयता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर 27 डिसेंबर पर्यंत करावयाची होती.

नक्की वाचा शीतल आमटेंच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला समोर

वर्धा जिल्ह्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नोंदणीत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील 1,512 शाळांपैकी 1,074 शाळांनी (71.03) नोंदणी केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रथम क्रमांकावर असलेल्या मुंबईमध्ये 1,767 पैकी 1,611 शाळांची नोंदणी केली आहे. (91.17 टक्‍के) राज्यात फिट इंडिया मोहिमेअंतर्गत 109908 शाळांपैकी 50838 (46.25 टक्‍के) शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wardha district get second number in Fit India movement