अनुदान लाटण्यासाठी बोगस नोंदणी

रामेश्‍वर काकडे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

वर्धा : सरकारकडून इमारत बांधकाम कामगारांच्या अनुदानात वाढ करून नोंदणीचे नियम शिथिल केल्याने जिल्ह्यात बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी होत आहे. गेल्या दोन वर्षांत नोंदणीकृत कामगारांच्या संख्येत तब्बल 17 हजार 400 नी वाढ झाली आहे. केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी बांधकाम कामगारांची संख्या फुगल्याचे पुढे आले आहे. एका जिल्ह्यातील ही परिस्थिती, तर संपूर्ण राज्यात हा आकडा किती असेल याची कल्पना येऊ शकते.

जिल्ह्यात एप्रिल 2015 पर्यंत कामगार कार्यालयाकडे 7 हजार 857 इमारत बांधकाम कामगारांची नोंद होती. त्यात 27 जुलै 2018 ला सद्यःस्थितीत 25 हजार 327 नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या झाली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत 17 हजार 470 नोंदणीकृत कामगार वाढले. या बोगस बांधकाम कामगारांना चाप कोण लावणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. शासनाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध अनुदानाच्या योजनांचा लाभ देण्यात येतो. अनुदानात सरकारने एक जानेवारी 2017 पासून भरमसाठ वाढ केली आहे. शिवाय नोंदणीसाठी असलेली प्रक्रियाही शिथिल केल्यामुळे दिवसेंदिवस नोंदणीकृत कामगारांत वाढ होत आहे. ग्रामसेवकांची स्वाक्षरी व प्रमाणपत्र बोगस असल्याचा संशय आल्यामुळे 250 नोंदणी प्रक्रिया थांबविली. कामगाराला दरवर्षी 2500 रुपये तसेच विवाहासाठी 30 हजार रुपये मिळतात.

Web Title: wardha news

टॅग्स