वर्धा : विजेच्या झटक्याने आईसह चिमुकलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

प्रियंका किसना गाखरे (वय 30) या कपाटामधून काही वस्तू काढण्यासाठी गेली असता. प्रियंका कपाटाला चिटकून राहिल्या. त्यानंतर धनश्री किसना गाखरे (वय 2) ही आपली आई कपाटाजवळ उभी असल्याचे पाहून तेथे गेली. आईला आवाज देत चिमुकलीने आईला हात लावला. यात चिमुकलीही त्याठिकाणाहून फेकली गेली. 

वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव येथील राहत्या घरी कपाटला अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्याच्या झटका बसून आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका किसना गाखरे (वय 30) या कपाटामधून काही वस्तू काढण्यासाठी गेली असता. प्रियंका कपाटाला चिटकून राहिल्या. त्यानंतर धनश्री किसना गाखरे (वय 2) ही आपली आई कपाटाजवळ उभी असल्याचे पाहून तेथे गेली. आईला आवाज देत चिमुकलीने आईला हात लावला. यात चिमुकलीही त्याठिकाणाहून फेकली गेली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार करून नागपूरला पाठविण्यात आले. मात्र नागपूर येथे उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.

Web Title: Wardha news Death of Mother and girl with electric shock