
पावसाळी वातावरण दोन-तीन दिवस कायम राहणार आहे. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होऊन थंडी कमी होणार आहे. वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुढील आठवड्यात गारठा वाढून कडाक्याची थंडी पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.
नागपूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘निवार’ चक्रीवादळाचा विदर्भालाही तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ पश्चिमोत्तर दिशेने वेगाने सरकत आहे. वादळाचा सर्वाधिक तडाखा तमिळनाडू, तेलंगण, कर्नाटक, आंध्रप्रदेश व केरळला बसणार असला तरी, विदर्भातही थोडाफार प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
विशेषतः पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. पावसाळी वातावरण दोन-तीन दिवस कायम राहणार आहे.
पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होऊन थंडी कमी होणार आहे. वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुढील आठवड्यात गारठा वाढून कडाक्याची थंडी पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.
सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी
गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर विदर्भावर पुन्हा पावसाचे सावट निर्माण झाले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी व शुक्रवारी विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २६ ऑक्टोबरनंतर विदर्भात पावसाचीही शक्यता आहे. काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह वादळी तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वादळाचा प्रभाव विदर्भातही दिसून येणार आहे. पावसाळी वातावरण दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्यानंतर कडाक्याची थंडी अपेक्षित आहे. विदर्भात सोमवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवली. गेल्या काही दिवसांपासून असलेले पाऊस आणि ढगाळ वातावरण नाहिसे होताच विदर्भात पुन्हा थंडीचा कडाका वाढला. गारठायुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येत असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
संपादन - नीलेश डाखोरे