Crime News : अडाण नदीवरील प्रकल्पात आढळळा पुरुष अन् महिलेचा मृतदेह, वाशिम जिल्ह्यातील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news in washim district

Crime News : अडाण नदीवरील प्रकल्पात आढळळा पुरुष अन् महिलेचा मृतदेह, वाशिम जिल्ह्यातील घटना

मागील काही दिवसांपूर्वी कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट लगत असलेल्या अडाण नदीवर दोन घटना घडल्या होत्या. या नदीवरील प्रकल्पात दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यातील या नदीवरील प्रकल्पावर दोन अज्ञात मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे सातत्यान या ठिकणी घडणाऱ्या या घटना हत्या आहेत की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच 29 मे रोजी दोन अल्पवयीन मुलींचा तर 10 जून रोजी ही एका मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यू झालो होता. आज पुन्हा एकदा या ठिकाणी दोन मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, सर्वधर्म आपत्कालीन संघटनेने मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. या दोन मृतदेहांपैकी तरुणीची ओळख पटली असून खुशी (वय 20) असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी कारंजा इथली रहिवासी आहे. तर तरुण हा दापुरी गावातील असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा: MP : हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १२ मुली पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, पिंपरी फॉरेस्ट तलावात पिकनिकसाठी आलेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 10 जून रोजी घडली होती. शाळेला सुट्ट्या असल्याने तलाव परिसरात फिरण्यासाठी आली असता ही घटना घडली. ईश्वरी गजानन भागव असं या तरुणीचं नाव होते. तीर अमरावतीच्या तिवसा जिल्ह्यातील होती. ईश्वरी तिच्या मित्र-मैत्रिणीसह फिरण्यासाठी आली होती.

29 मे रोजी याच तलाव क्षेत्रात दोन 18 वर्षीय तरुणींचा पाण्यात पाय घसरुन मृत्यू झाला होता. या दोन्ही तरुणी कारंजा दहिपुरा इथल्या रहिवासी होत्या. शाफीआ नासीर अली आणि उजमा अनिस अन्सारी अशी दोन तरुणींची नावं होती. कारंजा इथल्या या दोन्ही तरुणी पिकनिकसाठी पिंपरी फॉरेस्ट गावानजीक अडाण धरणावर गेल्या होत्या. यावेळी पाय घसरुन दोघीही त्या धरणात पडल्या. पोहता येत नसल्याने धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांना दिली होती.

हेही वाचा: संजय राऊतांना जामीन की कोठडी? आज होणार सुनावणी

Web Title: Washim Adan Dam Project Found Dead Bodies Of Women And Men Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..