कोणत्याही आक्रमणाला उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

वाशीम - ‘देशाच्या सीमेलगत सुरू असलेल्या घडामोडींमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. मात्र, देशावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी शनिवारी (ता. ८) येथे केले. 

येथील पाटणी कमर्शिअल कॉम्प्लेक्‍समध्ये वेकोलिच्या वतीने आयोजित ‘सबका साथ, सबका विकास’ संमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील होते. आमदार राजेंद्र पाटणी, आमदार तानाजी मुटकुळे, भाजप वाशीमचे प्रभारी शिवराय कुळकर्णी, नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भामरे म्हणाले,  भारतीय सैन्याने आजपर्यंत अनेकवेळा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत देशाचे रक्षण केले आहे. सर्जिकल स्ट्राइकदरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करण्याची कामगिरी आपल्या जवानांनी यशस्वीपणे केली आहे. देशावर कोणतेही आक्रमण झाल्यास त्याला, त्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता भारतीय सैन्यदलाकडे आहे. त्यामुळे सीमारेषेवर सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे चिंता करण्याचे कारण नाही. काश्‍मीरच्या प्रश्‍नावर सरकारचे बारीक लक्ष असून, काश्‍मीरमधील परिस्थिती निवळत आहे. दहशतवादाविरोधात सरकार कडक पावले उचलीत असून, दहशतवादाचा बीमोड करण्यासाठीही भारतीय सैन्य उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे असेही ते म्हणाले.

Web Title: washim news subhash bhamre