कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

वाशीम - कर्जबाजारीपणाला कंटाळून मालेगाव तालुक्‍यातील मुंगळा व मंगरुळपीर तालुक्‍यातील तऱ्हाळा येथे शेतकऱ्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुलाब पुंडलिक इंगळे (रा. मुंगळा) व भास्कर ज्ञानदेव आगळे (रा. तऱ्हाळा) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. इंगळे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. 2) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. आगळे यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी (ता. 1) रात्री आत्महत्या केली.
Web Title: washim vidarbha news two farmer suicide