स्लॅब कोसळून चौकीदाराचा मृत्यू

file photo
file photo

नागपूर  : वर्धमाननगरातील आयनॉक्‍स पूनम मॉलचा स्लॅब शुक्रवारी रात्री अचानक कोसळला. या घटनेत मलब्याखाली दबून चौकीदाराचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. पार्किंगमधील वाहनांचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी मॉलचे संचालन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.जयप्रकाश शर्मा (64) रा. हिवरीनगर, शांती ले-आउट असे मृत चौकीदाराचे नाव आहे. मुक्ताबाई गजभिये (50) आणि अन्य एक व्यक्ती या घटनेत जखमी झाले. आयनॉक्‍स मॉलची सर्वात वरची स्लॅब आणि भिंत जीर्ण झाली असून, कधीही कोसळू शकते, याबाबत मॉलचे संचालन करणाऱ्यांना माहिती होती. तरीही येथे विविध ब्रान्डच्या प्रतिष्ठानांसह मल्टिप्लेक्‍सही सुरू होते. कर्मचाऱ्यांसोबतच प्रेक्षक आणि ग्राहकांचा जीव धोक्‍यात घालून मॉलमध्ये व्यवसाय सुरू होता. शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास जोराचा आवाज होऊन एका भागातील स्लॅब कोसळला. समोरच्या भागातील भिंतीचा मलबा खाली पडला. मलबा अंगावर पडल्याने जयप्रकाश यांचा मृत्यू झाला. मुक्ताबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. संभाव्य धोका लक्षात घेऊन संपूर्ण मॉल रिकामे करण्यात आले. मॉलच्या आत जाणारे मार्ग बंद केल्याची माहिती आहे. घटनेनंतर मॉलचा काही भागही वाकला असल्याचे बोलले जाते.या मॉलचे बांधकाम फार जुने नाही. परंतु, स्लॅब कोसळला त्या भागात पाण्याची टाकी होती. सतत पाणी मुरत असल्याने स्लॅब आणि भिंत जीर्ण होऊन मोडकळीस आली होती. याबाबत कल्पना असूनही खबरदारीचा उपाय केला नव्हता. लकडगंज पोलिसांनी मॉलचे मालक आणि व्यवस्थापन करणाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com