विद्यापीठाचे "चौकीदार' झोपेत! 

विद्यापीठाचे "चौकीदार' झोपेत! 

नागपूर - देशभरातील राजकारण "चौकीदार' या शब्दाने ढवळून निघाले आहे. सत्तापक्ष वा विरोधीपक्ष "चौकीदार'वरून निवडणूक अभियान राबवत आहे. असे असताना विद्यापीठातील चौकीदार झोपेत आहे की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 15 दिवसांपूर्वी परीक्षा भवनाच्या लॉकरमधून चोरी गेलेल्या पैशाबद्दल अद्यापही खुलासा झाला नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या प्रकरणावर विद्यापीठ प्रशासनाने कमालीचे मौन बाळगले आहे. 

नागपूर विद्यापीठात सद्यस्थितीत उन्हाळी परीक्षांचे काम सुरू आहे. परीक्षांचे पेपर सेट करण्यासाठी नागपुरातून तसेच नागपूरबाहेरून दररोज परीक्षक परीक्षा भवनात येत आहेत. नियमांनुसार एक पेपर सेट करण्यासाठी परीक्षकांना 350 रुपयांचे मानधन तसेच शंभर रुपयांपर्यंत "कन्व्हेनन्स' देण्यात येतो. ही रक्कम साधारणत: रोख स्वरूपात असते. यासाठी विद्यापीठाकडून गोपनीय विभागाला सुमारे 10 लाखांपर्यंतचा अग्रीम निधी देण्यात येतो. दोन धनादेशांत ही रक्कम देण्यात येते. त्यामुळे हा हिशेबातील घोळ नसून अनेक वर्षांपासून संबंधित क्‍लर्क या आगाऊ रकमेचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी व्याजाने पैसे देऊन करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे यावर विद्यापीठ आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

प्रकरणावर बोलणारे नाही 
सिनेट बैठकीमध्ये परीक्षा भवनातील पैसे गायब होण्यावर सदस्यांकडून प्रश्‍न विचारण्यात आला होता. मात्र, विद्यापीठाकडून त्यावर कुठलेही ठोस उत्तर मिळाले नाही. त्यातूनच कुलगुरूंनी प्रसार माध्यमांवर अघोषित बंदी लादल्याचे दिसते. शिवाय प्रकरणावर बोलण्यास प्रशासनातील एकही अधिकारी तयार नसल्याने प्रकरणात बराच घोळ असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com