अशीही पाण्याची सेवा.. पक्षांच्या सोयीसाठी अनोखा उपक्रम!

राजेश सोळंकी
सोमवार, 30 एप्रिल 2018

दररोज जातांना पेपर वाटून झाल्यावर परत येतांना दोन्ही कॅनमध्ये पाणी भरुन ते या झाडावर बांधलेल्या मडक्यात पक्षासाठी टाकतात. हा त्यांचा आता नेहमीचा उपक्रम झाला आहे.

आर्वी (जि. वर्धा) - तालुक्यातील मासोद ते सुसुंद ८ किमी वर्तमानपत्र वाटून परत येतांना पक्षाचे सोयीसाठी दुतर्फा झाडावर ५० मडकी बांधली आणि या मडक्यात दररोज पाणी टाकून शेकडो पक्षाची तृष्णा भागविण्याचे अनोखे कार्य मासोदचे विपिन पांडे करतात. 

विपिन पांडे हे वृत्तपत्र विक्रेता आहेत मासोद ते सुसुंद ८ किमी पेपर वाटपचे काम करतात डब्लिपुर सहेली हेटी सुसुंद मासोद आदी गावात ते वृत्तपत्रे वाटप करतात.

सध्या कद्क उन्हाळा सुरु आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. पाण्याअभावी पशुपक्षाचे काय हाल असेल? पाण्याअभावी पशुपक्षाचे वाताहात पाहुन विपिन पांडे यांनी रस्त्यावरील दुतर्फा असलेली हिरवी झाडे शोधली. ज्यावर पक्षांचा आवास आहे. त्या ५० झाडावर मातीची ५० मडकी बांधली. दररोज जातांना पेपर वाटून झाल्यावर परत येतांना दोन्ही कॅनमध्ये पाणी भरुन ते या झाडावर बांधलेल्या मडक्यात पक्षासाठी टाकतात. हा त्यांचा आता नेहमीचा उपक्रम झाला आहे.

पक्षांना पाणी पिताना बघुन मनाला फार समाधान वाटते, असे बिपिन पांडे यांनी 'सकाळ'ला सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Water for Birds in Aarvi