घरातील टाइल्समधून निघताहेत पाण्याचे बुडबुडे!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : गेल्या पंधरा दिवसांमध्ये उपराजधानीत झालेल्या संततधार पावसामुळे गोधनी परिसरात जागोजागी पाणी साचले आहे. तुंबलेल्या पाण्याचा सर्वाधिक फटका येथील एलआयसी कॉलनीतील नागरिकांना बसतो आहे. अनेकांच्या घरातील स्टाइल्समधून चक्‍क पाण्याचे बुडबुडे निघत असल्याने नागरिकांचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन समस्या दूर करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

गोधनी भागांत जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी तुंबले आहे. पावसामुळे दोन-तीन वर्षांपूर्वी राहायला गेलेल्या एलआयसी कॉलनीतील नागरिक सर्वाधिक त्रस्त आहेत. घराभोवताल तुंबलेल्या पाण्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. धनंजय मानकर, ज्ञानेश्‍वर धाडसे, श्री बोदाडेंसह काहींच्या घरातील स्टाइलमधून चक्‍क पाण्याचे बुडबुडे निघत असल्याचे संतापजानक चित्र दिसून आले. दिवसरात्र निघणाऱ्या बुडबुड्यांमुळे घरात सर्वत्र पाणी जमा झाले आहेत. घरगुती सामानही ओले झाले आहे. त्यामुळे ड्युटी व हातची कामे सोडून येथील नागरिकांना भांड्याने पाणी उचलून बाहेर फेकावे लागत आहे. बिल्डरने सदोष बांधकाम करताना पाण्याचा निचरा होण्याची कसलीच सोय केलेली नाही. शिवाय नागपूर सुधार प्रन्यासतर्फे येथील रोडवर गिट्‌टी व मुरुम टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे रोडही उंच झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखीणच भर पडली आहे.
वस्तीतील अनेकांच्या घराच्या पाठीमागे मांडीभर पाणी जमा झाले आहेत. पाण्यासोबत घाण व कचरा जमा झाल्याने डास व मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. परिणामत: मलेरियासारखे साथीचे आजार पसरण्याची भिती नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. यासंदर्भात गोधनीचे सरपंच दीपक राऊत यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी यावर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.

पावसाचे पाणी बुडबुड्यांवाटे आमच्या घरात आल्याने संपूर्ण घरात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे राहणे कठिण झाले आहे. हातची कामे टाकून दिवसरात्र घरातील पाणी बाहेर काढावे लागत आहे. दोन दिवसांपासून आम्ही नीट झोपही घेऊ शकलो नाही. प्रशासनाकडे याकडे लक्ष द्‌यावे, अशी आमची मागणी आहे.'
-धनंजय मानकर
(रहिवासी, एलआयसी कॉलनी)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water bubbles coming out of the house tiles!