जिरवतो पाऊस, मिळवतो वर्षभर पाणी

अनुप ताले
सोमवार, 11 जून 2018

जून ते आॅगस्ट, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वाहनांची गर्दी कमी असते. त्यामुळे दरवर्षी या काळात आवारात सर्वत्र चर खोदून पाणी जीरविण्याचा उपक्रम आम्ही राबवीतो. त्यामुळे आजपर्यंत कधीही बाजार समितीच्या कुपनलीकांचे पाणी आटले नाही. इतरांनीसुद्धा रेनवाटर हार्वेस्टिंगद्वारे त्यांच्या भागात पाणी जीरवावे व पाण्याचा योग्य वापर करावा.
- शिरीष धोत्रे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला.

अकोला : ‘तीन महिन्यात होणारा पाऊस वर्षभर पुरतोच, फक्त तो साठवणे गरजेचे’ या विचारांची नियोजनात्मक बांधणी करून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने, रेन वाटर हार्वेस्टींगचा राजआदर्श निर्माण केला आहे. आवारात सर्वत्र चर खोदून पाणी जीरविण्याचा उपक्रम समितीद्वारे दरवर्षी राबविला जातो. त्यामुळे आजपर्यंत कधीच येथील कुपनलीकांचे पाणी अाटले नसल्याचे, बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी सांगितले.

जिल्ह्यात नव्हेतर विदर्भातही दशकापासून पर्जन्यमान घटले आहे. त्यामुळे परिसरात पाणी टंचाईमुळे दुष्काळी परिस्थिती ओढवते. लोकसंख्या वाढीसोबतच, उद्योग व शेतीमधील पाण्याचा वापर वाढल्याने, जिल्ह्यात जवळपास एक हजार मिमी पाऊस पडणे व तो जमिनीमध्ये मुरणे गरजेचे आहे. मात्र, नियोजनशुन्य पाण्याचा वापर, वृक्षतोड आणि जलसंवर्धन, जलसिंचन, रेनवाटर हार्वेस्टीगबाबत नागरिकांची उदासीनता यामुळे, मोठा फटका तीन वर्षात परिसरातील नागरिकांना व वनसृष्टीला बसला. प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचे सकट गडद होत आहे. तेव्हा रेन वाटर हार्वेस्टींग करून, पावसाचे पाणी जीरवणे, साठवणे व कमीतकमी वापर केल्यास या संकटाचे निराकरण करता येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारात दरवर्षी चर खोदून पाणी जीरविणाचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई असतानाही बाजार समितीच्या कुपनलीकांना वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध झाले. यंदाही समितीच्या आवारात चर खोदण्यात आले असून, पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

जून ते आॅगस्ट, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वाहनांची गर्दी कमी असते. त्यामुळे दरवर्षी या काळात आवारात सर्वत्र चर खोदून पाणी जीरविण्याचा उपक्रम आम्ही राबवीतो. त्यामुळे आजपर्यंत कधीही बाजार समितीच्या कुपनलीकांचे पाणी आटले नाही. इतरांनीसुद्धा रेनवाटर हार्वेस्टिंगद्वारे त्यांच्या भागात पाणी जीरवावे व पाण्याचा योग्य वापर करावा.
- शिरीष धोत्रे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला.

Web Title: water conservation in Akola