पाणीदार गावांच्या ध्येयाने झपाटलेले डॉ. अरूण पावडे

राजेश सोळंकी
रविवार, 6 मे 2018

'वॉटर कप' हि स्पर्धा जनसहभागावर अवलंबून असल्याने गावोगावी जन प्रबोधन करून गावकर्‍यांना उत्साहीत करून लोकांचा सहभाग वाढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. या वर्षी देखील डॉ. अरून पावडे यांचे रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना श्रमदानाला आवश्यक असणारी साहीत्य व गावोगावी श्रमदानाचे कार्य सुरू आहे.

आर्वि (जि. वर्धा) : जल चळवळीत सहभागी असलेल्या अवलियांपैकी एक आर्वीतील पेशानी डॉक्टर असलेले, हृदय रोग तज्ज्ञ, वर्धा जिल्ह्यात सुपरीचीत असणारे डॉ. अरूण पावडे. आर्वी आणि वर्धा येथे यांची अविरत रूग्णसेवा सुरू आहे. डॉ. पावडे यांची दिनचर्या नेहमीच फार व्यस्ततेची असते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्यासाठी, राज्याला पाणीदार करण्यासाठी शासनस्तरावर व पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपच्या माध्यमातून जनचळवळ उभी केली.

२०१७ ला आर्वी तालुक्याची निवड पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप या स्पर्धेसाठी झाली आणि आर्वी तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी गावे सज्ज झाली. हे सर्व डॉ. पावडे यांना कळले असता तालुक्यातील गावांना पाणीदार करण्यासाठी स्वतःच्या दैनंदिन व्यस्ततेतून वेळ काढून स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात जाऊन श्रमदानाला हातभार लावला. सोबतीला रेड क्रॉस सोसायटीला उभे करत प्रत्येक गावातील कामादरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेत गावकऱ्यांना यथोचित मदत केली. काही गावात टोपले, पावडे आणि टिकास यासारख्या श्रमदानाला उपयोगी पडणार्‍या वस्तू दिल्या तर कुठे श्रमदान करणार्‍यांना पाणी, अल्पोपहार इत्यादी साठी सढळ हाताने सहकार्य केले होते.

'वॉटर कप' हि स्पर्धा जनसहभागावर अवलंबून असल्याने गावोगावी जन प्रबोधन करून गावकर्‍यांना उत्साहीत करून लोकांचा सहभाग वाढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. या वर्षी देखील डॉ. अरून पावडे यांचे रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना श्रमदानाला आवश्यक असणारी साहीत्य व गावोगावी श्रमदानाचे कार्य सुरू आहे.

डॉ. पावडे यांनी लोकांच्या थेट ह्रदयाला भिडणाऱ्या स्वकृत्याने जनसहभाग वाढविण्यास प्रत्यक्ष रित्या हातभर लावला आहे. मागील सत्रात आर्वी तालुक्यातील काकडदरा या गावाला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकांचे बक्षिस मिळाल्याने या वर्षी 'वॉटर कप' टिकविण्यासाठी ही स्पर्धा आर्वी साठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे डॉ. पावडे आणि रेड क्रॉस सोसायटी यांची टिम प्रत्येक गावात सक्रियतेने श्रमदानत सहभाग घेत आहे.

अश्या या डॉ. पावडे' यांनी केलेल्या कार्याला सलाम.... आणि पाणीदार गावांचे लक्ष नक्कीच साध्य होऊन मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी वॉटर कप वर आर्वीचे नाव कोरले जाईल असे एकंदरीत गावोगावी होणाऱ्या जलसंवर्धनाच्या कामातून दिसत आहे.

Web Title: water cup compitition in Arvi