'जायकवाडी'साठी उघडले 'निळवंडे'चे दरवाजे 

विद्याचंद्र सातपुते
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

अकोले - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी आठ वाजता निळवंडे धरणातून "जायकवाडी'ला पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. निळवंड्यातून 3.85 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्यासाठी धरणाचे सर्व पाचही दरवाजे सकाळी उघडण्यात आले. त्यातून सहा क्‍युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात झेपावले आहे. 

पाणी सोडण्याच्या कारवाईत अडथळा होऊ नये, यासाठी धरणावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जलसंपदा विभागातर्फे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दर चार तासांची दोन हजार क्‍युसेकने पाणी वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. दहा हजार क्‍युसेकपर्यंत हा विसर्ग वाढविण्यात येईल. निळवंडे जलाशयांतून 3.85 टीएमसी पाणी "जायकवाडी'साठी सोडण्यात येणार आहे. निळवंडे ते जायकवाडी धरणाचे अंतर 172 किलोमीटर आहे. त्यामुळे भंडारदरा व निळवंड्याचे पाणी "जायकवाडी'त पोचण्यासाठी तीन दिवसांच अवधी लागेल. 

दरम्यान, भंडारदरा व निळवंडे धरणांतून "जायकवाडी'ला पाणी सोडण्यापूर्वी तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी प्रवरा नदीवरील अगस्ती सेतू पुलावर शेतकरी संघर्ष समितीतर्फे तीन दिवसांपासून सत्याग्रह आंदोलन सुरू होते. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मंत्रालयात 13 नोव्हेंबरला बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यावर सर्वपक्षीयांनी एकमत करून, तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने आज पाणी सोडण्याच्यावेळी धरणावर कोणताही तणाव नव्हता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water for 'Jaayqwadi' left from nilwande dam