पावसाळा ताेंडावर; शंभर उपाययाेजना कागदावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नळ याेजनेची सुद्धा अपूर्ण
पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ५० गावांसाठी नळ याेजना विशेष दुरूस्तीच्या ५० उपाययाेजना मंजुर केल्या आहेत. त्यापैकी अातापर्यंक केवळ २६ उपाययाेजनाच पूर्ण झाल्या आहेत. याव्यतिरीक्त मंजुरी मिळालेल्या नवीन विंधन विहिरींच्या २११ पैकी १७०, कुपनलिकेच्या १२१ पैकी १०७ तर तात्पुरत्या पूरक नळ याेजनेच्या २९ पैकी केवळ पंधराच उपाययाेजना पूर्ण झाल्या आहेत.

अकाेला : ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळांपासून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने एक हजार ८४ उपाययाेजना प्रस्तावित केलेल्या असल्यानंतर सुद्धा आतापर्यंत केवळ ५७२ उपाययाेजनांनाच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ ४७६ उपाययाेजनाच पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या ९६ उपाययाेजना अद्याप कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांत सूर्य आग आेकत आहे. त्यातच ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामीणांना उन्हाळ्यात पिण्यासाठी सहज पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला. त्याअंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील ५३४ गावांत पाणी टंचाईची स्थिती असल्याचे प्रस्तावित केले हाेते. या गावांतील नागरिकांसाठी एक हजार ८४ उपाययाेजना सुद्धा प्रस्तावित केल्या. प्रस्तावित उपाययाेजनांपैकी जिल्हाधिकाऱ्यांनी ५७२ उपयायाेजनांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामध्ये विंधन विहिर, कुपनलिका, नळ याेजना विशेष दुरुस्ती, विहिर अधिग्रहण, तात्पुरती नळ याेजना व टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या याेजनांचा समावेश आहे.

६३४ गावांसाठीच्या ५७२ उपाययाेजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सुद्धा अद्यापपर्यंत ५१८ उपाययाेजनाच पूर्ण झाल्या आहेत. संबंधित उपाययाेजनांमुळे गावांतील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे संकट काही प्रमाणात कमी झाले असले तरी जवळपास शंभर गावांसाठी मंजुरी देण्यात आलेल्या ९६ उपाययाेजना अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. उन्हाळ्याला संपायला जेमतेम दिवस शिल्लक असल्यानंतर सुद्धा अद्याप मंजुरी दिलेल्या उपाययाेजना पूर्ण न झाल्यामुळे ग्रामीणांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. तर दुसरीकडे प्रस्तावित आराखड्यानुसार पाचशेवर उपाययाेजना ह्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

नळ याेजनेची सुद्धा अपूर्ण
पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ५० गावांसाठी नळ याेजना विशेष दुरूस्तीच्या ५० उपाययाेजना मंजुर केल्या आहेत. त्यापैकी अातापर्यंक केवळ २६ उपाययाेजनाच पूर्ण झाल्या आहेत. याव्यतिरीक्त मंजुरी मिळालेल्या नवीन विंधन विहिरींच्या २११ पैकी १७०, कुपनलिकेच्या १२१ पैकी १०७ तर तात्पुरत्या पूरक नळ याेजनेच्या २९ पैकी केवळ पंधराच उपाययाेजना पूर्ण झाल्या आहेत.

Web Title: water problem in Akola