गोरेगाव तालुक्यात हातपंप साहित्या अभावी नादुरुस्त

गोरेगाव तालुक्यात हातपंप साहित्या अभावी नादुरुस्त

गोरेगाव ( गोंदिया) : तालुक्यात कमी पावसाने नदी, नाले, धरण, विहिरींना मुबलक पाणीसाठा नाही. त्यामुळे १ हजार ४० हातपंप (विंधनविहीर), सार्वजनिक विहिरी ६२५, खासगी विहिरी ३ हजार ३०५ यांच्या पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.

पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग १०४० हातपंपाना पाईप व ५५ ग्रामपंचायतीना मागणीनुसार साहित्य देत नसल्याने पाणी टंचाई नागरीकांना जाणवू लागली आहे.

तालुक्यात ५५ ग्रामपंचायतअंतर्गत ९७ गावे व ५ रिठी गावे येतात. या गावातील पिण्याचा पाणी पुरवठा हातपंप (विंधनविहीर) यावर अवलंबून आहे. या हातपंपाची संख्या व  २०० फूट खोलपर्यत सिंचन वीज पंप, हातपंप असल्याने विहिरींना पाणी साठा नाही. त्यातच यंदा पाऊसाअभावी गोरेगाव तालुका मिनी दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले पण पाणी टंचाई नियोजन करण्यात आले नाही.

पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग प्रत्येकी हातपंप १ हजार ८०० रुपये पाणी पट्टी कर आकारणी करुन दरवर्षी १८ लाख ८७ हजार रुपये कर मागणी करीत आहे. पण हातपंप साहित्य ग्रामपंचायत मागणीनुसार पंचायत समिती पाईप व इतर साहित्याचा पुरवठा करीत नाही.

त्यामुळे अनेक हातपंप नादुरुस्त असल्याने नागरीकांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदेला साहित्यांची मागणी २ हजार पाईप व इतर साहित्याची मागणी करुनसुद्धा ७५० पाईप देण्यात आले. त्यामुळे साहित्य ग्रामपंचायत मागणीनुसार पुरवठा करु शकत नाही, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने 'सकाळ'ला दिली.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हातपंपातील जुन्या पाईपांना रब्बर ट्युब पट्टी बांधण्यात येतात व पाणी पुरवठा केला जातो, अशी सरपंच,ग्रामसेवकात चर्चा होत आहे सार्वजनिक विहिरी ६२५ पैकी २५१ विहीरींना पाणी साठा नाही तसेच खासगी १४०७ विहीरींना पाणी साठा नाही. एप्रिल महीन्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई नागरीकांना होणार असल्याने हातपंप साहीत्य ग्रामपंचायत यांना तात्काळ देण्यात यावे असी मागणी होत आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात सध्या पाणी टंचाई नाही. तालुका टँकरमुक्त गाव आहे. हातपंप साहित्य ग्रामपंचायत मागणीनुसार पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग करु शकत नाही. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग मागणीनुसार पंचायत समितीला साहीत्य पुरवठा करीत नाही
- वाय. जी. रहांगडाले, कनिष्ठ लिपीक पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती गोरेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com