पाणपोई सुरू करा, विश्रांतीसाठी मंडप टाका

Summer
Summer

नागपूर - उन्हाचा जोर वाढत असून पारा ४३ पार झाला आहे. उन्हात उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्‍यक उपायोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायतींनी गावाच्या बसस्थानकावर पाणपोई व विश्रांतीसाठी सावलीच्या ठिकाणी मंडप टाकण्याच्या सूचना केल्या आहेत.

उष्माघाताने कुणाचाही बळी जाऊ नये, त्यावर वेळीच उपचार व्हावे, यासाठी आरोग्य विभागाने हे पाऊल उचलले आहे. यासाठी दहा ते बारा कलमी टिपणी आरोग्य विभागाने तयार केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रस्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. 

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन पलंग, कुलर आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच २५ केंद्रांमध्ये एसी लावण्यात आले आहेत. उर्वरित केंद्रात कुलरची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका, आशासेविका यांनाही जाणीवजागृती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात उष्माघाताने एकही जण दगावल्याची नोंद नाही.

हे करावे
  पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा.
  हलक्‍या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा
  उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
  उन्हात जाताना टोपीखाली ओलसर कपडा ठेवा.
  पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.
  ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे करू नये
  शक्‍यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
  पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
  गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका.
  उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा
  स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.
  मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्‍स टाळा
  खूप प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com