महापौरांचे आवाहन; पाणी काटकसरीने वापरा

पेंच - जलाशयाची पाहणी करताना महापौर नंदा जिचकार, तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके व अधिकारी.
पेंच - जलाशयाची पाहणी करताना महापौर नंदा जिचकार, तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके व अधिकारी.

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प व कन्हान नदीत अत्यल्प साठा असून, महिनाभरच पुरेल इतके पाणी आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी पाण्याचा आवश्‍यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

पाणीटंचाईची तीव्रता जाणून घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी पेंच व कामठीनजीकच्या कन्हान नदी प्रकल्पाला भेट दिली. सोबत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, नगरसेवक भगवान मेंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्‍वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मनोज गणवीर, उपअभियंता राजेश दुफारे, ओसीडब्ल्यूचे एच. आर. व्यवस्थापक, के. एम. पी. सिंग, संजय रॉय, व्यवस्थापक (देखभाल व दुरुस्ती) कालरा, प्रवीण सरण उपस्थित होते.

दोन्ही ठिकाणी पाण्याची पातळी खोल गेल्याचे दौऱ्यातून निदर्शनास आले. दोन्ही प्रकल्प मिळून केवळ ४४.४३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी प्रतिदिन १.३० दलघमी पाण्याचा वापर सुरू आहे. अर्थात उपलब्ध साठा केवळ १० जूनपर्यंत पुरेल, असे वास्तव अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले. दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी नागपूरकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.

चोरीवर निर्बंध आणि जनजागृती
पाण्याच्या चोरीवर निर्बंध घाला, नगरसेवकांच्या माध्यमातून पाणी बचतीसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. भविष्यात पाणीटंचाई भासू नये यासंदर्भातही बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. टंचाईवर मात करण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलावी, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत आयुक्त अभिजित बांगर व अतिरिक्त आयुक्त राम जोशी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com