विहिरी, नदी-नाले कोरडेठण्ण

Water-Issue
Water-Issue

सावनेर तालुक्‍यात जलसाठ्यांनी गाठला तळ; जनावरे, बागायतदारांना झळ, उपाययोजना शून्य
सावनेर - सूर्याचा प्रकोप वाढला आहे. उन्हाचा तडाखा सुरू आहे. पारा चढत असताना पशुपक्षी, मानव व बागायतदारांना पाण्याची जास्त गरज आहे. परंतु, तालुक्‍यातील जलसाठा तळ गाठत आहे. नदी, नाले कोरडे पडलेत. कुठे विहिरी व बोअरवेल आटले, तर कुठे तहानलेली स्थिती निर्माण झाली आहे.

जलस्वराज योजना व जलसंवर्धनाची काही कामे झालीत. मात्र, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उन्हाचे चटके सुरू होताच पाण्याचे फटके बसू लागलेत. यामुळे प्रशासनाचे दौरे सुरू झालेत. तालुका समन्वय समितीची पाणीपुरवठ्यावर आढावा बैठक पार पडली. पंचायत समितीतर्फे गावपातळीवरील समस्या जाणून घेतल्यात; मात्र तहान लागल्यावरच विहीर खोदण्याची प्रथा सुरूच आहे. 

त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तालुक्‍यातील काही भागांत उन्हाचे चटके बसताच पाणीसमस्येला सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासनाची वेळेवर तारांबळ उडाली आहे. नदी, नाले कोरडे पडल्याने गुरे चारणाऱ्यांना दूरवर पाण्याचा पत्ता लागत नाही. भूगर्भातील पातळी खोल गेल्याने बऱ्याच विहिरी कोरड्या पडल्यात, तर काही विहिरी तहानलेल्या आहेत. अशीच स्थिती बोअरवेलची झाली आहे. त्यामुळे बागायत व भाजीपाला शेतीचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. लघु प्रकल्पातील जलसाठे कोरडे पडलेत. काही प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा आहे. हा साठा बघून तालुक्‍यात पाणी पेटणार काय, असा प्रश्‍न जनमानसाला भेडसावत आहे. येथील काही उद्योगांवरही टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. खुर्सापार, जैतपूर, सावळी, जोगा माळेगाव, पंढरी, जलालखेडा, छत्रापूर आदी गावांना पाण्याचे फटके बसत आहेत.

सिमेंट रस्त्यांमुळे पाणी वाहून जाते. वृक्षांची संख्या कमी झाली आहे. आदी कारणांमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जात आहे. 
- डॉ. विलास डोईफोडे, सावनेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com