'हनुमान सागर'च्या जलसाठ्यात मोठी वाढ

पंजाबराव ठाकरे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्हा सीमेवर असलेल्या हनुमान सागर वान धरणातील साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रात्री पासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने एकाच दिवसात 6 टक्के साठ्यात वाढ झाल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.

संग्रामपूर (बुलढाणा) : बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्हा सीमेवर असलेल्या हनुमान सागर वान धरणातील साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रात्री पासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने एकाच दिवसात 6 टक्के साठ्यात वाढ झाल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.

वाण धरणात 7 ऑगस्टला 50 टक्के पाण्याचा साठा असल्याची नोंद आहे. तर 8 ऑगस्टचे सकाळी 56 टक्के साठ्याची नोंद असल्याची माहिती येथील अधिकाऱ्याने दिली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा कमीच म्हणावा लागेल. गत वर्षी या महिन्यात 65 टक्के धरण भरले होते.रात्री पासून सारखा पाऊस सुरू असल्याने या भागातील नदी, नाले वाहते झाले आहेत. जिल्हा अधिकारी यांनी बिनतारी संदेश द्वारा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. 
खेडे गावातील रस्त्यावरची  तात्पुरती वाहतूक ही बंद पडली आहे. वाण धरनातून तीन जिल्ह्यात  पाणी पुरवठा योजना आहेत. शेती साठी ही या धरणातील काही प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. आगस्ट सप्टेंबर मध्ये सदर धरणाची पातळी 95 टक्के होणे अपेक्षित आहे. एका दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात 6 टक्क्याने वाढ झाल्याने यंदा धरणाची पातळी बरी राहण्याची आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water storage increases in Hanuman Sagar Buldana