हिवरखेड येथील पाणी प्रश्न पेटला; ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

अकोला (हिवरखेड) येथील पाणीपुरवठा आठ दिवसांपासून खंडीत आहे.

अकोला (हिवरखेड) - मागील आठ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडीत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यासंबंधी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला बुधवारी (ता. 4) कुलुप ठोकले. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आणला. यावेळी थोडावेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील ठाणेदार यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी जाऊन परिस्थिती सांभाळली.

hivarkhed akola

कुलुप तोडून सरपंचानी संभाळला कारभार -
हिवरखेड येथील ग्रामपंचायतीवर पाणीपुरवठा खंडित असल्याने त्रस्त नागरिकांनी मोर्चा काढत कुलुप ठोकले. यावेळी सरपंच यांनी पोलिसांच्या उपस्थित दगडाने कुलुप तोडून आपला कार्यभार संभाळला.

hivarkhed akola

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Water supply at Akola Hivarkhed is interrupted from last eight days