महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद, विद्यार्थ्यांची शाळा बुडाली...

The water supply closure, students' school is missing from the month ...
The water supply closure, students' school is missing from the month ...

गोंडपिपरी : सकमुरसह सात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे महिनाभरापासून पाणी पुरवठा थांबला. पाणीवाटपात राजकारण आले अन तीन गावांचा पुरवठा सूरू झाला. मात्र चार गावात अद्यापही पाणी मिळत नसल्याने महिलांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठेच हाल होत आहेत. पाण्यासाठी अनेक दिवस शाळेला दांडी मारण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर येत असल्याने गावकरी प्रचंड संतापले आहेत. 

चकनांदगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून सात गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र गेल्या महिनाभरापासून या योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा ठप्प होता. यामुळे सकमुरातून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. राजकारणही झाले. आपल्या संदर्भात चुकीचा संदेश जाण्याच्या भितीने राजकारण्यांनी सकमुर, चकबापुर व गुजरीतील पाणीपुरवठा सुरु झाला. सत्ताधाऱ्यांनी तीन गावाचा आधार घेत पुरवठा सूरू केल्याचा दिंडोरा पिटविला. माध्यमातून श्रेय टिपण्यासाठी धावपळ सूरू झाली. पण चार गावातील भिषण पाणीटंचाईकडे त्यांनी पुरते दुर्लक्ष केले. यामुळे पाण्याअभावी चकनांदगाव, हेटीनांदगाव, कुडेनांदगाव, टोलेनांदगावातील नागरिकांचे महिनाभरापासून प्रचंड हाल होत आहे. 

सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त पाणी आणी पाणी हा एकच विषय ठरलेला आहे. योजनेचे पाणी येत नसल्याने पाण्यासाठी दुरवर आसलेल्या नाल्यातील पाणी पिण्यासाठी वाफरले जात आहे. यामुळे नागरिकांसमोर आरोग्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आमदार संजय धोटे यांनी गोंडपिपरी तालूक्याला दत्तक घेतले पण चार गावातील पाणीप्रश्नी त्यांच्या उदासिन भुमीकेने संतापच संताप आहे. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास योजनेला कुलूप ठोकण्याचा इशारा चार गावातील नागरिकांनी दिला आहे.

तालुका दत्तक घेणाऱ्या आमदार संजय धोटे यांची चार गावातील पाणी समस्येप्रती प्रचंड उदासिन भुमिका राहिली आहे. एकाच योजनेतून तीन गावांना पाणी मिळते व चार गाव वंचित रहातात. हा अन्याय आहे. 

-मोरेश्वर येलमुले, सरपंच चकनांदगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com