मजुरांचे पगार थकले..पाणीपुरवठा थांबला..भर पावसाळ्यात सात गावातील नागरिकांचे हाल

संदीप रायपुरे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मागास व दुर्गम भागात गोंडपिपरी तालुका मोडतो. सकमुर, गुजरी, कुडेनांदगाव, टोलेनांदगाव, हेटीनांदगाव ही सिमावर्ती भागातील गाव. परीसरात वर्धा नदी वाहत असतांना हृी गावे मात्र दुष्काळी भागात मोडतात. या गावात पाण्याचे स्त्रोत नाहीत.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - कंत्राटदाराने मजुरांचे तिन महिन्याचे वेतन दिले नाही. यामुळे संतापलेल्या मजूरांनी काम करणे बंद केले. अशा स्थितीत सकमूरसह एकूण सात गावातील पाणीपूरवठा गेल्या चार दिवसापासून बंद आहे. यामुळे दुष्काळाची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या या गावातील हजारो नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

मागास व दुर्गम भागात गोंडपिपरी तालुका मोडतो. सकमुर, गुजरी, कुडेनांदगाव, टोलेनांदगाव, हेटीनांदगाव ही सिमावर्ती भागातील गाव. परीसरात वर्धा नदी वाहत असतांना हृी गावे मात्र दुष्काळी भागात मोडतात. या गावात पाण्याचे स्त्रोत नाहीत. शेकडो फुटावर पाणी लागत नाही. अशात नाल्यातील पाणी प्यायची वेळ परिसरातील नागरिकांवर आली. अशात सकमुरसह एकूण सात गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नंदनवन ठरली. याच योजनेने परिसरातील शेकडो कुटुंबियांची तहान भागविली जाते.

पण गेल्या चार दिवसापासून योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला अन् शेकडो नागरिकांचे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू झाले.
चंद्रपुरातील ठाकुर नामक ठेकेदाराकडे या योजनेचे काम आहे. त्यांनी गेल्या तिन महिन्यापासून मजुरांचे पगार केले नाही. परिणामी मजुरांनी काम करणे बंद केले. अन् पाणीपुरवठा बंद झाला.

ऐन पावसाळ्यात योजनेतून होणारा पाणीपुरवठा बःद झाल्याने सात गावातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.

मजुरांची तक्रार...
तीन महिन्याचे वेतन थकविल्याने संतप्त झालेल्या मजूरांनी बिडीओकडे तक्रार दाखल केली आहे. तातडीने कंत्राटदाराने वेतन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: water supply stopped at godpimpri chadrapur