वन्यप्राण्यांची तृष्णा भागविणार २० टॅंकर

पेंच व्याघ्रप्रकल्पातील कृत्रिम पाणवठ्यावर पाणीपुरवठा करणारा टॅंकर.
पेंच व्याघ्रप्रकल्पातील कृत्रिम पाणवठ्यावर पाणीपुरवठा करणारा टॅंकर.

नागपूर - मध्य भारतातील वन्यजीवांचे आश्रयस्थळ असलेल्या पेंच, बोर व्याघ्रप्रकल्पासह टिपेश्‍वर, पैनगंगा आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रकल्प संचालकांनी ५२९ नैसर्गिक, कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या प्रकल्पातील सर्वच ठिकाणी एप्रिल ते जून या काळात २० टॅंकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येईल. 

पेंच व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालन आर. एम. गोवेकर यांनी याअंतर्गत येणाऱ्या सर्वच क्षेत्रातील वन्यप्राण्यांसाठी उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला. पेंच व्याघ्रप्रकल्पांतर्गत येणाऱ्या अभयारण्य, व्याघ्रप्रकल्पात नैसर्गिक पाणवठे १७९ तर कृत्रिम पाणवठ्यांची संख्या ३५० आहे. नैसर्गिक पाणवठ्यातील १७९ पैकी ७६ पाणवठ्यांवर बारामाही पाणी असते. ३५० कृत्रिम पाणवठ्यांपैकी १२३ पाणवठ्यांवर सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. १९ पाणवठ्यांवर हॅण्डपंपने पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित १९८ कृत्रिम पाणवठ्यांपैकी ६१ पाणवठ्यांवर तीन शासकीय टॅंकरने तर १३७ पाणवठ्यांवर भाडेतत्त्वावरील सात टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. नैसर्गिक पाणवठे एप्रिलअखेर जिथे कोरडे पडतील त्याच्या आजूबाजूचे कृत्रिम पाणवठे भरण्यात येतील. 

एप्रिल ते जून या काळात २० टॅंकरच्या साह्याय्याने पाणीपुरवठा केला जाईल. बंद पडलेल्या सोलर पंपाची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच अस्तित्वात असलेल्या ३१ बोअरवेल्सवर नवीन सोलर पंप बसविण्यात आले आहे. पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर असल्याने यंदा २०१७-१८ या वर्षाच्या तुलनेत अधिक निधी खर्च होणार आहे. यंदा वन्यप्राण्यांची भटकंत थांबेल, असा दावही क्षेत्र संचालकांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com