पाण्यासाठी वणवण; साेळाशेवर टॅंकरने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

भूजल पातळी खाेल गेल्याने व राज्यातील बहुतांश जलाशयामधील पाणी टल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. काही धरणे ही पूर्णतः काेरडीठाक पडली आहेत. परिणामी अनेक पाणी पुरवठा याेजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक हांडाभर पाण्यासाठी पायपिट करत आहेत.

अकाेला : उन्हामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटले असल्याने राज्यातील एक हजार 568 गावे व एक हजार 246 वाड्यांमध्ये टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लाखाे नागरिकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागवण्यात येत आहे.

भूजल पातळी खाेल गेल्याने व राज्यातील बहुतांश जलाशयामधील पाणी टल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. काही धरणे ही पूर्णतः काेरडीठाक पडली आहेत. परिणामी अनेक पाणी पुरवठा याेजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक हांडाभर पाण्यासाठी पायपिट करत आहेत. परंतु नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यामुळे गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात गंभीर हाेत चाललेल्या पाणी टंचाईच्या स्थितीची माहिती टॅंकरने सुरू असलेल्या पाणी पुरवठ्यावरून लक्षात येते. राज्यात सध्या एकूण एक हजार 622 टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये 195 टॅंकर शासकीय तर एक हजार 427 टॅंकर खाजगी आहेत. राज्यातील एक हजार 568 गावे व एक हजार 246 ताड्यातील लाखाे नागरिकांची तहान टॅंकरने भागवण्यात येत आहे. यावर्षी मॉन्सूनचे आगमन लांबल्यास टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅंकरने सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याची माहिती
विभाग गावे वाड्या टॅंकर
अमरावती 306 00 300
काेंकण 173 508 95
खांदेश 299 311 247
पुणे 74 283 67
मराठवाडा 673 144 872
नागपूर 43 00 41
---------------------------------------
एकूण 1568 1246 1622

Web Title: water tanker in Maharashtra