अपरिहार्य परिस्थितीतच टॅंकर मंजुरीचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

अकोला - पिण्याचे पाणीटंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टॅंकर मंजूर करण्याचे, तसेच तत्पूर्वी अन्य उपाययोजनातून पाणीपुरवठा करणे शक्‍य आहे का, याबाबत तपासणी करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.

सरकारने २९ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढून दुष्काळ जाहीर केला आहे. अशा जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर मंजूर करण्याचे संबंधित उपविभागीय अधिकारी यांना आदेश दिला आहे. मात्र टॅंकर मंजूर करणे अतिशय खर्चिक उपाययोजना असल्याने ही उपाययोजना अपरिहार्य परिस्थितीतच कमीत कमी खर्चाची उपाययोजना म्हणून मंजूर करणे आवश्‍यक आहे. याबाबत सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप सचिवांनी सर्व जिल्ह्यांना लेखी सूचना दिल्या आहेत. यामध्ये टॅंकर मंजूर करण्यापूर्वी विहीर, विंधन विहीर अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, बंद प्रादेशिक योजना कार्यान्वित करण्याबाबत तपासणी करून पाणीपुरवठा करणे शक्‍य आहे का, याची पडताळणी आवश्‍यक असल्याचे सूचित केले आहे.

Web Title: Water Tanker Sanction