वाठोडा येथील जलवाहिनी फुटली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

नागपूर : अत्यल्प पाणी साठ्यामुळे महापालिकेने शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला. यामुळे नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशात वाठोडा येथील दहनघाट ते सिम्बॉयसीसपर्यंत तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या बाजूची जलवाहिनी चार दिवसांपूर्वी फुटल्याने पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतही संताप व्यक्त केला जात आहे.

यंदा अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने महापालिकेवर पहिल्यांदा पाणी कपातीची वेळ आली. पावसाळा शेवटच्या टप्प्यात असतानाही शहराला पाणीपुरवठा करणारे जलसाठे भरलेले नाही. तोतलाडोह जलाशयात जेमतेम 12 टक्‍के पाणीसाठी आहे. यामुळे पाणी कपातीचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला आहे. यामुळे पाणी बचतीसंदर्भात महापालिकेची जबाबदारी वाढली आहे. मात्र, वाठोडा परिसरात सिमेंट रस्ते निर्माण कार्यात पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटल्याने पाणी वाहून जात आहे. एकीकडे नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे तर दुसरीकडे पिण्याचे पाणी वाहून जात असल्याने नागरिकही संताप व्यक्त करीत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The waterway at Vathoda explodes