उमरेड-पवनी-कऱ्हांडलाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

file photo
file photo

नागपूर : नागपूर व भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला विस्तारित अभयारण्याचा मार्ग राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मोकळा झाला होता. त्यामुळे अभयारण्याला उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य या नावाने ओळखले जात होते. भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलासह पाच गावांचा समावेश केल्यानंतर आता त्या नावाचे विस्तारीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
आघाडी सरकार असताना तत्कालीन अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या पुढाकाराने 2012 मध्ये उमरेड-कऱ्हांडला हे अभयारण्य घोषित केले होते. या अभयारण्यातील "जय' नावाच्या वाघाने पर्यटकांचे लक्ष वेधल्यानंतर व्याघ्र दर्शनासाठी हमखास राखीव जंगल म्हणून ओळख निर्माण केली होती. त्या लोकप्रियतेमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह अनेक चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रीनींही भेट दिली होती. त्यांनाही आशियातील मोठा वाघ "जयचे दर्शन झाले होते. मात्र, "जय' वाघ गायब झाल्यानंतर पर्यटकांची संख्या घटली आहे.
वन्यप्राण्यांचे भ्रमणक्षेत्र वाढविण्यासाठी पवनी वन परीक्षेत्राचा समावेश या अभयारण्यात करण्याचा प्रस्ताव वन विभागाने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यानुसार शुक्रवारी हरीसिंग सभागृह सेमिनरी हिल्स येथे वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत पाच गावांतील सरपंचांसह गावकरी हजर होते. वनराज्यमंत्र्यांनी संबंधित सरपंचाच्या अडचणी ऐकूण घेतल्या. तसेच मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांची पुनर्वसन विषयक धोरण आणि पुनर्वसनाच्या दोन कोटी पॅकेज याबाबत सविस्तर माहिती सरपंच व गावकऱ्यांना देण्यात आली व त्यांच्या शंकाचे निरासनही करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com