वेकोलि खाण व्यवस्थापकाला विनयभंग प्रकरणात अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

वणी (जि. यवतमाळ) : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी वेकोलि कोळसा खाणीच्या व्यवस्थापकास अटक करण्यात आली. ही घटना भालर वेकोलि वसाहतीत घडली. शिरपूर पोलिसात तक्रार दाखल होताच अटकेची कारवाई करण्यात आली. अजितकुमार मिश्रा ( वय 50), असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो उकणी येथील कोळसा खाणीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. 30 सप्टेंबरला सकाळी 11 वाजतादरम्यान भालर वेकोलि वसाहतीत पीडित अल्पवयीन मुलगी शिकवणीसाठी मैत्रिणीसोबत जात असताना अजितने पाठलाग करून तिला रस्त्यात अडविले. तिच्यासोबत अश्‍लील शब्दात बोलणे सुरू केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत घरी सांगितले.

वणी (जि. यवतमाळ) : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी वेकोलि कोळसा खाणीच्या व्यवस्थापकास अटक करण्यात आली. ही घटना भालर वेकोलि वसाहतीत घडली. शिरपूर पोलिसात तक्रार दाखल होताच अटकेची कारवाई करण्यात आली. अजितकुमार मिश्रा ( वय 50), असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो उकणी येथील कोळसा खाणीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. 30 सप्टेंबरला सकाळी 11 वाजतादरम्यान भालर वेकोलि वसाहतीत पीडित अल्पवयीन मुलगी शिकवणीसाठी मैत्रिणीसोबत जात असताना अजितने पाठलाग करून तिला रस्त्यात अडविले. तिच्यासोबत अश्‍लील शब्दात बोलणे सुरू केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत घरी सांगितले. पालकांनी लगेच शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यवस्थापकास ठाणेदार सतीश चवरे, योगेश ढाले यांनी अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wcl mining manager arrested in molation case