"आम्ही एनएमआरडीएचे सदस्य आहोत की नाही'

"आम्ही एनएमआरडीएचे  सदस्य आहोत की नाही'
नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व नागपूर सुधार प्रन्यासतर्फे घेण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचा लॉटरी सोहळ्याला शहरातील झडनभर नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत. मात्र यात एनएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे सदस्य चांगलेच नाराज झाले असून आपण सदस्य आहोत की नाही असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घरकुलांची लॉटरी काढण्यात येणार आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार प्रमुख उपस्थिती तर विशेष उपस्थितांमध्ये शहरातील आमदार, विधान परिषद सदस्य, सुधार प्रन्यासचे विश्‍वस्तांच्याही नावांचा समावेश आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजता अंबाझरी रोडवरील नैवद्यम सभागृहात हा सोहळा होणार आहे. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका वितरित झालेल्या आहेत. त्यात आपली नावे नसल्याचे बघून सदस्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मात्र यामुळे सदस्य एनएमआरडीएच्या भोंगळ कारभारावर चांगलेच नाराज झाले आहेत.
खोडसाळपणा की अनावधानाने नावे सुटली
एनएमआरडीएवर अशासकीय सदस्य म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, विजय राऊत, संजय ठाकरे, अजय बोढारे, जयप्रकाश गुप्ता, विलास त्रिवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी एकाचेही नाव निमंत्रण पत्रिकेत नाही. सर्वांच्या नियुक्तीचा आदेश मे महिन्यात काढण्यात आलेला आहे. निमंत्रण पत्रिकेत तब्बल 24 लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची नावे आहेत. फक्त सहा सदस्यांची नावे वगळण्यात आली आहेत. कोणीतरी खोडसाळपणा केली की अनावधानाने नावे सुटली हे समजायला मार्ग नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com