आम्ही मतदान करणारच, तुम्हीबी करा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

कुही/पचखेडी  (जि.नागपूर) : लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी विरखंडीवासींनी शंभर टक्‍के मतदान करण्याचा निर्धार शनिवारी (ता. 19) सायंकाळी सहाला सामूहिक शपथ घेऊन केला. 

कुही/पचखेडी  (जि.नागपूर) : लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी विरखंडीवासींनी शंभर टक्‍के मतदान करण्याचा निर्धार शनिवारी (ता. 19) सायंकाळी सहाला सामूहिक शपथ घेऊन केला. 
इंग्रजी गुलामीनंतर भारत स्वतंत्र झाला. भारतीयांनी लोकशाही जीवनपध्दती स्वीकारली. लोकशाहीच्या माध्यमातून राजा निवडण्यासाठी दर पाच वर्षानी निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी तरतूद भारतीय संविधानात आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही भारतात नांदते. कारण भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय प्रौढ व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार दिला. विशेष म्हणजे राजा असो व रंक त्या दोघांच्याही मतांचे मूल्य सारखेच आहे. एवढा महत्त्वाचा अधिकार भारतीय संविधानाने दिला म्हणून तो मतदानाचा हक्क आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वजण येत्या 21 ऑक्‍टोबरला बजावणार आहोत, अशी शपथ विरखंडीवासींनी घेतली. तो मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा, असे आवाहन करण्यात आले. निवडणुकीत कोणाला मतदान करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. परंतु निवडणुकीत भागच न घेणे हा लोकशाहीचा अपमान आहे. सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटनेने दिलेला अधिकार पार पाडणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. याची जाण सर्वसामान्य जनतेला झाल्यामुळे आम्ही विरखंडीवासींनी जनतेत संदेश देण्यासाठी मतदान करण्याची शपथ घेतली, असे सामाजिक कायकर्ते राजानंद कावळे यांनी याप्रसंगी सांगीतले. 
यावेळी राजानंद कावळे अभिषेक डहाके, जितेंद्र चांदेकर, अश्विन भोयर, नागेश्वर गेडाम, ईश्वर नरुले, समीर रेवतकर, परमानंद लोखंडे, शोभा डहाके, मयना नरुले, शालू भोयर, जिजा राउत, संघमित्रा मेश्राम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will vote, you please!