अकोला जिल्ह्यातील पहिले डिजिटल हवामान फलक 

अनुप ताले
गुरुवार, 28 जून 2018

डिजिटल फलकाद्वारे कळणार काय? 
या डिजिटल माहिती फलकाद्वारे नागरिकांना व शेतकऱ्यांना दररोज हवामान घटक जसे की, रोजचे कमाल व किमान तापमान, प्रत्यक्ष तापमान, सकाळ व दुपारची हवेतील आद्रता किती आहे याची माहित वेळोवेळी जाणून घेता येईल. गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान व १ जून २०१८ पासूनचे एकूण पर्जन्यमान किती, इत्यादी अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे.

अकोला : जिल्ह्यातील पहिला व एकमेव ‘डिजिटल हवामान फलक’ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या फलकावरून अद्यावत हवामानाची माहीती मिळणार आहे. विद्यापीठातील कृषी विद्याविभाग व कृषी हवामानशास्त्र विभागाच्या संयुक्तपणे नुकतेच या फलकाचे अनावरण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांच्याहस्ते करण्यात आले. 

विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम. भाले यांच्या संकल्पनेतून या हवामान विषयक माहिती फलका स्थापना करण्यात आली. त्याकरिता सहयोगी प्राध्यापक डॉ.अरविंद तुपे, डॉ.एम.आर. देशमुख व डॉ.नितीन गुप्ता यांनी पुढाकार घेतला. माहिती फलकाच्या अनावरण प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.व्ही.के खर्चे, कृषी विस्तार संचालक डॉ.डी.एम. मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ.एम.बी. नागदेवे, कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ.बी.व्ही. सावजी, दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. इंगोले तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

डिजिटल फलकाद्वारे कळणार काय? 
या डिजिटल माहिती फलकाद्वारे नागरिकांना व शेतकऱ्यांना दररोज हवामान घटक जसे की, रोजचे कमाल व किमान तापमान, प्रत्यक्ष तापमान, सकाळ व दुपारची हवेतील आद्रता किती आहे याची माहित वेळोवेळी जाणून घेता येईल. गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान व १ जून २०१८ पासूनचे एकूण पर्जन्यमान किती, इत्यादी अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे.

Web Title: weather digital board in Akola