
Weather Update : पुढील चार दिवस गडचिरोली जिल्ह्यात पाऊस
गडचिरोली : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसा १६ ते १९ मार्च २०२३ दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच विजा पडण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१६ मार्च २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा (वाऱ्याचा वेग- ३० ते ४० किमी प्रती तास राहण्याची) वाहण्याची अधिक शक्यता आहे.
१७ मार्च २०२३ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच तुरळक ठिकाणी गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता आहे. १८ व १९ मार्च २०२३ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व
सोसाट्याचा वारा (वाऱ्याचा वेग- ३० ते ४० किमी प्रती तास राहण्याची) वाहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी या कालावधीमध्ये सुरक्षित राहुन याबाबत उचित खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.