तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार; सर्वाधिक 46 मुहूर्त मे महिन्यात 

बबलू जाधव 
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

यंदा नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत एकूण 11 मुहूर्त असल्याने वधू-वर पित्यांची आतापासूनच लगीनघाई सुरू झालेली आहे. गतवर्षी गुरूचा अस्त असतानाही 86 मुहूर्त होते. मात्र, या वर्षी गुरू अस्त लग्नसराईत आल्यामुळे 46 मुहूर्त असल्याची माहिती या क्षेत्रातील आर्णी येथील गाढे अभ्यासक संतोष दाभाडकर यांनी "सकाळ'ला दिली. 

आर्णी (जि. यवतमाळ) : तुळशी विवाह आटोपल्यानंतर लगीनघाईचे दिवस सुरू होतात. यावर्षी येत्या 20 नोव्हेंबरपासून विवाहासाठी मुहूर्त प्रारंभहोत असून ते जून 2020 पर्यंत चालणार आहे. म्हणजेच आठ महिन्यांच्या काळात 46 लग्नतिथी आहेत. त्यापैकी मे महिन्यामध्ये सर्वाधिक मुहूर्त असल्याने हा महिना लग्नाच्या धामधुमीचा ठरणार आहे. 

दिवाळी सण पार पडल्यानंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. आज, शुक्रवारपासून तुळशी विवाहाला प्रारंभ झाला. यावर्षी तुळशी विवाहानंतर तब्बल नऊ दिवसांनी विवाह मुहूर्त प्रारंभ होणार आहेत. यावर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरूचा अस्त असल्याने महिनाभर शुभ मुहूर्त राहणार नाहीत. यंदा नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत एकूण 11 मुहूर्त असल्याने वधू-वर पित्यांची आतापासूनच लगीनघाई सुरू झालेली आहे. गतवर्षी गुरूचा अस्त असतानाही 86 मुहूर्त होते. मात्र, या वर्षी गुरू अस्त लग्नसराईत आल्यामुळे 46 मुहूर्त असल्याची माहिती या क्षेत्रातील आर्णी येथील गाढे अभ्यासक संतोष दाभाडकर यांनी "सकाळ'ला दिली. 

यंदा कर्तव्य असणाऱ्या घरांमध्ये दिवाळीपेक्षा लग्नसराईत घाई बघायला मिळणार. यंदाच्या वर्षात गत वर्षीपेक्षा मुहूर्त कमी असल्याने लग्नकार्यासाठी मंगलकार्यालय मिळविणे अवघड ठरणार आहे. त्यासाठी आतापासूनच मंगलकार्य मिळविण्यासाठी घाई करण्यात येत आहे. लग्नपत्रिका, मंगलकार्यालये, बिछायत, लग्नाचे कापड खरेदी, भेटवस्तू खरेदी इत्यादी कामेही शक्‍य तितक्‍या लवकर उरकविण्यावर लग्नघरी जोर देण्यात येईल. 

अशा आहेत महिनानिहाय मुहूर्तांच्या तारखा 
नोव्हेंबर - 20, 21 ,23 ,28 
डिसेंबर - 1, 2, 3, 6, 8, 11, 12 
जानेवारी- 18, 20, 29, 30, 31 
फेब्रुवारी- 1, 4, 12, 14, 16, 20, 27, 
मार्च- 3, 4, 8, 11, 12, 19 
एप्रिल- 15, 16, 26, 27 
मे- 2, 5, 6, 8, 12, 14, 17, 18, 19, 24 
जून- 11, 14, 15. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wedding bar to fly after TulsiViwah; The highest 46 during the month of May