अबब...वीज चोरीचे अजबगजब फंडे

सागर कुटे
Friday, 13 December 2019

वीज चोरीसाठी ग्राहकांनी वापरलेले फंडे पाहून महावितरणचे अधिकारीही चक्रावले. एका ठिकाणी रिमोटने मीटरचे नियंत्रण केले होते. तर दुसऱ्या ठिकाणी मीटरला मागून छिद्र पाडले होते.

अकोला : महावितरणने वीज चोरीची मोहीम हाती घेतली आहे. त्यावेळी शहरात वीज चोरीची शेकडो प्रकरणे समोर येत आहे. मात्र, यामध्ये अनेक अफलातून प्रकार आढळून आले. हे प्रकार पाहून अधिकारीही थक्क झाले. हे ‘फंडे’ वापरुन वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना महावितरणने लाखोंचा दंड ठोठावला. तसेच वीज पुरवठा सुद्धा खंडित केला.

अकोला शहर विभागातंर्गत अकोट फैल भागात नोव्हेंबर महिन्यात वीज चोरीविरोधात धाडसत्र राबवत ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी याच्या नेतृत्वात महावितरण भरारी पथक व अकोला शहर उपविभाग तीन यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत 1 लाख 5 हजार 902 युनिट म्हणजेच 10 लाख रुपयापेक्षा जास्त रुपयाची वीज चोरी होत असल्याचे उघड करण्यात आले आहे. नियमानुसार तडजोड रकमेचा व वीजचोरी केलेल्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र, या कारवाईमध्ये ग्राहकांनी वीज चोरी करताना विविध फंडे वापरले होते.

हेही वाचा - महिलांची छेडछाड कराल तर कारागृहात जाल


मीटर सी. टी.मध्ये रेझिटन्स बसवले
महावितरणच्या कारवाईत एका ठिकाणी सी. टी. मध्ये रेझिटन्स बसवून वापर केलेल्या विजेच्या तुलनेत अत्यल्प देयक घेण्यासाठी वापरलेला फंडा उघड झाला. या फंड्यामध्ये ग्राहकाने सी. टी. च्या मधोमध रेझिटन्स बसवून घेतले होते. या रेझिस्टन्समुळे महावितरणकडून ग्राहकाला पाहिजे तेवढी वीज मिळते. मात्र, विजेचे मोजमाप करण्यासाठी सी. टी. आहे. त्याच्या मधोमध विशिष्ट पद्धतीने रेझिटन्स लावल्याने मीटरची गती अत्यल्प कमी होते. त्यामुळे वापर केलेल्या विजेच्या केवळ 10 ते 20 टक्केच देयक मिळते. हा प्रकार सर्वसामान्यतः नजरेत न येण्यासारखा आहे.

क्लिक करा - महिला अस्मितेच्या राज्यातील पहिल्या प्रयोगाला ग्रहण

Image may contain: 1 person
मीटर बायपास करणे
महावितरणकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विजेचे मोजमाप करण्यासाठी मीटरमध्ये सी. टी. (करंट ट्रान्झिस्टर) बसवण्यात आले. एका ग्राहकाने महावितरणकडून आलेला वीज पुरवठा मीटरमध्ये घेतला. विशिष्ट पद्धतीने कारागिरी करून सीटी बायपास करण्यात आली. यात वायर बाहेरून कट करून वीज घेतली. त्यामुळे येणाऱ्या विजेचे मोजमापच होऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहकाला मीटर बंद असे देयक दिले जाते. ही रक्कम अतिशय कमी राहते. सीटी बायपास करण्यासाठी कोणतेही उपकरण न बसवता ही कारागिरी केली जाते.

असे का घडले? - मेडिकल काॅलेजमधील रॅगींग भोवले

No photo description available.
रिमोट कंट्रोलने नियंत्रण
वीज मीटर नियंत्रित करण्यासाठी रिमोटचा शोध कारागिरांनी लावला. एका लहान आकाराच्या प्लास्टिक डबीला रिमोट बनवण्यात आले. या रिमोटमध्ये ठराविक रेझिटन्सचा वापर करण्यात आला. या रिमोटमध्ये हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर बसवले आहे. त्या हाय व्होल्टेजच्या वेव्ह व मीटरमधील वेव्ह मॅच करून मीटर बटननेच सुरू व बंद करता येते. विशेष म्हणजे हे मीटर 25 फुटांवरून नियंत्रण करू शकते. या कारवाईत दंड ठोठावण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी - नववर्षामुळे रेल्वे गाड्या फु्ल्ल

Image may contain: phone
सी. टी. वायर कट
विजेचे मोजमाप करण्यासाठी मीटरमध्ये बसविण्यात आलेल्या सी. टी. (करंट ट्रान्झिस्टर) ची वायर कट करून वीज घेतल्या जाते. यामध्ये मीटरला मागून व्होल पाडून मीटर बंद पाडण्यात येते. असा प्रकारही बहुतांश ठिकाणी आढळून येते. हा प्रकार या कारवाईमध्ये पुन्हा समोर आला. तर काही प्रकारात घरगुतीसाठी दिलेली वीज व्यावसायिक कामासाठी वापरण्यात येते.

वीज चोरीमुळे घडतात हे प्रकार
वीज चोरीमुळे विजेचा भार कमी जास्त होणे, वारंवार शार्टसर्किट होणे, आग लागणे, रोहित्र जळणे असे प्रकार होत असल्याने अखंडित सेवा देण्यास महावितरणला अडथळा निर्माण होतो. शिवाय महावितरणची वितरन हानी वाढून आर्थीक नुकसानही होते. त्यामुळे यापुढे आकस्मिक आणि सतत कारवाई करण्याचे निर्देश मुख्य अभियंता अनिल डोये यांनी दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weird electricity theft