#MeToo पेक्षा WeToo च्या पुढाकाराची गरज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

अकोला : सीमोल्लंघन अर्थात दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय. मात्र, मी टू मोहिमेत बाॅलिवूड आणि शहरी भागातील महिला पुढे येऊन बोलत आहेत. त्यात काय खरे, काय खोटे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, त्यांचे ऐकले पाहिजे. ही चळवळ ग्रामीण भागातही गेली सीमोल्लंघन झाल्याचे आपल्याला सांगता येईल, असा सूर बुधवारी आयोजित ‘सकाळ संवाद’च्या निमित्ताने अकोल्यातील विविध क्षेत्रातील नामवंत महिलांनी व्यक्त केला.

अकोला : सीमोल्लंघन अर्थात दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय. मात्र, मी टू मोहिमेत बाॅलिवूड आणि शहरी भागातील महिला पुढे येऊन बोलत आहेत. त्यात काय खरे, काय खोटे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, त्यांचे ऐकले पाहिजे. ही चळवळ ग्रामीण भागातही गेली सीमोल्लंघन झाल्याचे आपल्याला सांगता येईल, असा सूर बुधवारी आयोजित ‘सकाळ संवाद’च्या निमित्ताने अकोल्यातील विविध क्षेत्रातील नामवंत महिलांनी व्यक्त केला.

या मोहिमेला सर्वांनीच पाठिंबा दिला असून, महिला सबलीकरणाशी निगडीत विषयांना चालना मिळेल.#MeToo मोहिमेला आमचा पाठिंबा आहे. हे एक वादळ आहे. त्यात काही खरे असेल ते भविष्यात तपास होईल तेव्हा पुढे येईल. याद्वारे सुरु असलेले मंथन होतय हे चांगलं आहे. मात्र, हे ग्रामीण भागात पोहचणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

दशकभरानंतर मी टू चळवळ सुरू झाली. पुण्या-मुंबईच्या महिला व्यक्त होऊ लागल्या. तर ग्रामीण भागातील विना चेहरा, विना आवाजाच्या ज्यांना कोणतेही पाठबळ नाही असंख्य महिला वी टू म्हणू लागल्या. शेतात काम करताना, नॉन ग्रॅन्टेड शैक्षणिक संस्था, असंघटीत घरेलू कामगार आणि कुटुंबातीलच लोकांकडून वासनेच्या बळी गेलेल्या असंख्य महिला न्याय कसा मिळेल. जिल्हा प्रशासनाने महिला बालविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीअंती त्या शोषीत महिलेचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करावा.

- डॉ.आशा मिरगे, माजी सदस्य राज्य महिला आयोग

महिलांवर घरात किंवा बाहेर अत्याच्यार होतात. आर्थिक, शारिरिक, लैंगिक, भावनिक यांसारख्या शोषणातून न्यायालयात दाद मागता येईल. महिला बाल विकास अधिकारी किंवा न्यायालयात अर्ज करू शकते. तीला साठ दिवसात न्याय देण्याचा प्रयत्न केल्या जातो. गरज पुढे येवून बोलण्याची गरज आहे.

- मानोरकर, विधी अधिकारी, पोलिस अधिक्षक कार्यालय, अकोला

विधवेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन अतिशय वेगळा असतो. एकीकडे अत्याचार होत असताना आपल्या विधवा सूनेचा सांभाळ करणारे बरीच कुटुंब आपल्याला दिसून येतात. मात्र, पतीच्या निधनानंतर स्त्रीला आधार देणे कुटुंबाची जबाबदारी असते.

- प्रा.वंदना पिंपळखरे, भारतीय महिला तांत्रिक अधिकारी

स्त्री सर्जनशील आहे. तीच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण नवरात्र साजरे करतो. परंतु, स्त्रीला माणून म्हणून आपण बघतो का? सज्जन असल्याचा आव आणून बुवा-बाबांकडून केवळ अंधश्रध्देपोटी महिलांवर अत्याचार होत असतात. परंतु, समाजात विधवा, श्रीमंत, गरीब या सर्वांना सन्मान दिल्या गेला पाहिजे. अंधश्रध्दा कायद्यानुसार स्त्रीयांना मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाले आहे. मात्र, समाजव्यवस्था बदलणे गरजेचे आहे.
- स्वप्ना लांडे, विभागिय संपर्क प्रमुख, अंधश्रध्दा निर्मूलन समिती

Web Title: WeToo Need for Leadership MeToo