'स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

नागपूर - स्वतःला देशभक्त म्हणवून घेणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान आहे, असा सवाल करून काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते तसेच महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट संघावरच हल्ला चढविला. भाजपच्या चार वर्षांच्या राजवटीत अल्पसंख्याक तसेच देशाचे संविधानही धोक्‍यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.  

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मसिही अधिकार संमेलनाचे आयोजन मेकोसाबाग येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रीय सचिव आशिष दुवा, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. अनिल थॉमस, आमदार सुनील केदार, आशिष देशमुख, बबनराव तायवाडे, विकास ठाकरे, चारुलता टोकस, नामदेव उसेंडी, विजय बारसे आदी उपस्थित होते. 

खरगे म्हणाले, भाजपला संविधान मान्य नाही. त्यांना संघाच्या विचारांवर देश चालवायचा आहे. याकरिता जाती आणि धर्माच्या नावावर लोकांना भडकावून दंगे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या अजेंड्यावर शेतकरी नाही. आरोग्य व शिक्षणाला प्राथमिकता दिली जात नाही. पीकविमा योजना कंपन्यांच्या फायद्यासाठी काढण्यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.    

स्वातंत्र्यलढ्यात  ख्रिश्‍चनांचे योगदान
भाजपचे खासदार गोपाल यांनी स्वातंत्र्यलढ्यात खिश्‍चनांचे योगदान नसल्याचे वक्तव्य केले होते. यास खोडून काढताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपच्या नेत्यांनी इतिहास वाचून वक्तव्य करावे, असा टोला हाणला. चर्च, प्रार्थनास्थळांवर हल्ले केले जात आहेत.  यास सरकारचा पाठिंबा आहे? संविधानाचे नाव घ्यायचे मात्र त्यातील आचारविचार मानायचा नाही, असे भाजपचे धोरण आहे. दृष्टांच्या विरोधात एकत्रित लाढल्यास यश मिळले. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

Web Title: What is the contribution of the RSS in Freedom says mallikarjun kharge