काय? कस्तूरचंद पार्कचे वाजताहेत बारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर : शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या कस्तुरचंद पार्कची दैनावस्था झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. येथील मध्यवर्ती भागात असलेली बारादरी आणि लोखंडी तोफ याचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. नागरिकांची या ठिकाणी वस्ती वाढल्याने विद्रुपीकरण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, त्याचे संवर्धन करणाऱ्या हेरिटेज कमिटी आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

अनेक ऐतिहासिक सभांचे साक्षीदार म्हणून कस्तुरचंद पार्कची ओळख आहे. मात्र, काही वर्षांपासून या ठिकाणी सभा व रावण दहन यासारख्या कार्यक्रमांवर प्रशासनाकडून बऱ्याच अटी लादण्यात येत आहे. परिसरातील हेरिटेज वस्तूंना कुठलीही हानी पोहोचू नये हाच त्या मागचा उद्देश आहे. मात्र, असे असताना काही महिन्यांपासून मैदानाच्या मध्यभागी असलेली बारादरी वास्तू आणि जवळच असलेली तोफ यांची दुरवस्था होत असल्याचे चित्र आहे.
या परिसरात काही लोक वास्तव्यास असून, त्यांच्याकडून या वास्तू आणि तोफेचा उपयोग कपडे वाळविण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी होताना दिसून येतो. त्यामुळे पुरातन वास्तू खरोखरच सुरक्षित आहे काय, असा प्रश्‍न आता उपस्थित होतो आहे. दुसरीकडे 68 वर्षांपासून या परिसरात होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाच्या परवानगीसाठी वारंवार हेरिटेज कमिटीकडून जाचक अटी लादण्यात येताना दिसून येतात, हे विशेष.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? Disadvantages of Kasturchand Park