हे काय ? मेट्रोच्या सौंदर्याला विद्रुपीकरणाचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर : मेट्रो रेल्वेच्या आकर्षक पिलरलाही विद्रुपीकरणाचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शहर विद्रुपीकरणासाठी सेनेनेच पुढाकार घेतल्याचे मंगळवारी हिंगणा मार्गावर दिसून आले. महामेट्रो प्रशासनाने कारवाईस पुढाकार घेतल्याने सेनेने तत्परतेने झेंडे आदी काढले. मात्र, काही बॅनर महामेट्रोने काढून टाकले.

महामेट्रोने हिंगणा मार्गावरील पिलरवर नुकतीच रंगरंगोटी केली. एवढेच नव्हे, रिंग रोड टी-पॉइंटवर पिलरवर व्हर्टिकल गार्डन तयार करून परिसर हिरवागार केला. त्यामुळे या मार्गाच्या आकर्षणात भर पडली. परंतु, मंगळवारी शिवसेनेतर्फे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी पिलरवर होर्डिंग्स लावण्यात आले. एवढेच नव्हे, पिलरवर पोस्टर चिकटवून मेट्रोच्या सौंदर्याला ग्रहण लावले. सेनेच्या बॅनरसह पिलरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच महामेट्रोने दखल घेत कारवाईसाठी पाउले उचलली. काही बॅनर महामेट्रोने काढले. महामेट्रोच्या कारवाईमुळे सेनेलाही जाग आली. सेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने या मार्गावरील पिलरवर लावलेले झेंडे ताबडतोब काढले. मात्र, शिवसेनेच्या या कृतीने शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या सौंदर्याला ग्रहण लागल्याची चर्चा रंगली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is this? Eclipse of metro beautifulness