काय? पाच लाखांचे प्लॅस्टिक जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नागपूर : प्लॅस्टिकवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात साठा करून चिल्लर दुकानदारांना पुरविणाऱ्या गांजाखेत येथील व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनअंतर्गत महापालिकेच्या उपद्रव शोधपथकाने धाड घातली. या कारवाईत सुमारे सहा टन प्लॅस्टिक जप्त केले. जप्त प्लॅस्टिकची किंमत पाच लाखांच्या घरात असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने नियुक्त केलेल्या उपद्रव शोध पथकाला गोळीबार चौकालगत असलेल्या गांजाखेत येथील गुरुनानक स्टोअर्सच्या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तू साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तत्काळ गांजाखेत गाठून गोदामावर धाड घातली. यात पथकाला सुमारे 5,952 किलोच्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचा साठा आढळला. दुकानाचे मालक ओमप्रकाश वाधवानी गोदामातून चिल्लर व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक पुरवित होते. प्लॅस्टिकचा साठा जप्त करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? Five lakh plastic seized