काय? खड्ड्यांमुळे हात झाले फॅक्‍चर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : शहरातील खड्डे, खड्ड्यांमुळे होणारे अपघात, मृत्यू व रहदारीची समस्या नागपूरकरांसाठी नित्याचेच झाले आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचारी किशोर इंदूरकर यांचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाला. यामुळे त्यांच्या दोन्ही हातांवर शस्त्रक्रिया करावी लागली. 

इंदूरकर हे नागपूर जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागात विद्युत पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहे. दोन दिवसांपूर्वी ते नागपुरातील रमणा मारोती परिसरातील घरून सकाळच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालयाकडे दुचाकीने जात होते. धन्वंतरीनगर येथे महिला स्कूटीचालक खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात इंदूरकरांना आडवी आली. अपघात टाळण्यासाठी इंदूरकरांनी गाडीचे ब्रेक मारले. मात्र, तोल गेल्याने इंदूरकर खड्ड्यात पडले. बराच वेळ रस्त्यावर ते निपचित पडून होते. आजूबाजूच्या लोकांनी इंदूरकरांना उचलले व सक्करदरा येथील खासगी रुग्णालयात भरती केले.  डॉक्‍टरांनी एक्‍स-रे काढून तापसले असता दोन्ही हात फॅक्‍चर असल्याचे निदान झाले. दुसऱ्या दिवशी हातांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, इंदूरकरांची दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात व्हीव्हीपॅटतज्ज्ञ म्हणून ड्यूटी लागली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? Handmade fixtures due to pits