काय? महापालिकेमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हरताळ!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

नागपूर : गणेशोत्सवासाठी मूर्ती विक्रीस येण्यापूर्वी पीओपी मूर्तीच्या नियमांबाबत, पीओपी मूर्तीचा वापर टाळणे आदीबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी पूर्णपणे झटकून महापालिकेच्या आरोग्य विभागाने पीओपी मूर्ती विक्रेत्यांना सैल सोडले. किंबहुना त्यांना मोकळे रानच उपलब्ध करून दिले. त्यामुळे शहरात सर्वच बाजारांमध्ये पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी नियमांना डावलल्याचे दररोजच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. आरोग्य विभागाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.

शहरात गणेशोत्सवाची धूम सुरू असून, सर्वच प्रमुख बाजारांमध्ये गणेशमूर्ती विक्रीची आकर्षक दुकाने लागली आहेत. अनेक ठिकाणी गणेशमूर्ती प्रदर्शनही लागले आहेत. या दुकानांमध्ये मातीची मूर्ती असल्याचे फलक लागले आहेत. मात्र, याच दुकानांमधून पीओपीच्या आकर्षक मूर्तीचीही विक्री केली जात असल्याचे महापालिकेने केलेल्या कारवाईतून दिसून येत आहे.
पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी नियमानुसार या संबंधात दर्शनी भागात फलक लावणे बंधनकारक आहे. याशिवाय मूर्तीमागे लाल खूण करणे आवश्‍यक आहे. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही काही नव्या मूर्ती विक्रेत्यांनी मूर्ती विक्रीची दुकाने थाटली. त्यांना पीओपी मूर्ती विक्रीची माहितीच नसल्याने ते दंडास पात्र ठरत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पीओपी मूर्ती वापर टाळण्यासाठी तसेच विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी नियमांबाबत जनजागृती करणे अपेक्षित आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून जनजागृतीसाठी कुठलाही प्रयत्न दिसून आला नाही. त्यामुळे ठिकठिकाणी पीओपी मूर्ती विक्री केली जात आहे. एकीकडे जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. दुसरीकडे याच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे पीओपी मूर्तीची नियमांना डावलून विक्री केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? Municipal corporation shocks environmentally friendly Ganeshotsav