क्रिकेट बुकी भाटियाला अटक केव्हा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नागपूर : कुलर व्यावसायिक ऋषी खोसला हत्याकांडात नागपूर पोलिस मिक्‍की बक्षीचा कोणताही संबंध नाही. मिक्कीला कुणाच्या तरी सांगण्यावरून गोवण्यात आले. मधू बक्षीने हत्याकांडात क्रिकेट बुकी सुनील भाटिया आणि पती मिक्‍की बक्षीचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी मिक्‍कीला कोणतीही चौकशी न करता अटक केली. परंतु, सुनील भाटियाचा हत्याकांडाशी कोणताही संबंध नसल्याचा टेंभा स्वतः पोलिस मिरवत आहेत, असा आरोप मिक्‍कीचे नातेवाईक गुरुशरणसिंह बक्षी आणि अन्य नातेवाईकांनी पत्रपरिषदेत केला.

21 ऑगस्टला मिक्‍की बक्षी आणि मुलगा आर्यन रात्री अकरा वाजता पीव्हीआर सिनेमात चित्रपट बघायला गेले होते. साडेबारा वाजता चित्रपट रटाळ वाटत असल्यामुळे ते दोघेही घरी आले. रात्री दोन वाजता सदर पोलिस ठाण्यातील पोलिस घरी आले. त्यांनी मिक्‍कीला ताब्यात घेतले तर मुलगा आर्यनला झोपेतून उठवून ठाण्यात नेल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मिक्‍की आणि मधू दोघेही दीड वर्षापासून वेगळे राहायचे. त्यांच्यात घटस्फोटासाठी न्यायालयात खटला सुरू होता. कायदेशीररीत्या दोघेही वेगळे होणार होते, असे असताना मिक्‍की ऋषी खोसला याचा खून करण्याचा विचार करणार नाही. परंतु, पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता मिक्‍कीला ऋषीच्या हत्याकांडात गोवले. काही महिन्यांपूर्वी जरीपटक्‍यात ऋषी खोसलाने कुण्यातरी महिलेशी अश्‍लील चाळे केले होते, त्या प्रकरणाचा गुन्हा जरीपटका ठाण्यात दाखल आहे. त्या गुन्ह्याशी संबंधित व्यक्‍तीने ऋषीचा खून केला असावा. त्या दिशेने तपास न करता केवळ ऋषी आणि मधूचे अनैतिक संबंध होते, हाचा धागा पकडून पोलिस दबावात तपास करीत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केली. पत्रपरिषदेला मिक्‍कीचा मुलगा, बहीण ज्योती बक्षी, गुरुचरणसिंह बक्षी, सुरेंद्रपाल सिंह आणि जतिंदर सिंह उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When was cricket bookie Bhatia arrested?