दररोज 270 एमएलडी पाणी जाते कुठे? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नागपूर - अनेक गावांची तहान भागविण्याची शक्‍यता असलेले 270 एमएलडी पाणी दररोज कुठे मुरतेय? याबाबत अद्याप हिशेब नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. दररोज 640 एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, अद्याप 270 एमएलडी पाण्याचे उत्पन्न बुडीत आहे. शिवाय गेल्या सात वर्षांत पाणी वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या दुप्पट झाली असली तरी पाण्याची थकबाकी 100 कोटींवर गेल्याने महापालिकेच्या कारवाईची धारही बोथड झाल्याचे चित्र आहे. 

महापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे सोमवारी (ता. 16) नगरसेवक तसेच पत्रकारांसाठी कन्हान नदीतील पाण्याची पातळी तसेच येथील जलशुद्धीकरण केंद्राचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यादरम्यान शहरातील पाणी, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची स्थिती यावर प्रकाश टाकणारे सादरीकरण ओसीडब्ल्यूच्या रुचा पांडे यांनी केले. सादरीकरणातील आकडेवारीने नगरसेवकांनाही आश्‍चर्यात टाकले. ओसीडब्ल्यूच्या आकडेवारीनुसार 2011-12 पासून सातत्याने पाण्याच्या गुणवत्तेत वाढ झाली. याशिवाय निवासी, संस्था, व्यावसायिक, झोपडपट्ट्यातील पाण्याचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. आज शहरात 3 लाख 36 हजार 686 ग्राहक आहेत. मात्र, अनेक ग्राहकांना पाण्याची देयके देण्याची इच्छाच नसल्याचेही पुढे आले. विशेष म्हणजे यात मोठ्या थकबाकीदारांचाही समावेश असल्याने थकीत रकमेचा आलेख 100 कोटींवर गेला आहे. या थकबाकीसाठी महापालिकेने 1 लाख 76 हजार 35 नळजोडण्या बंद केल्या. मात्र, कारवाईचा काहीही परिणाम झाला नसल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले. सादरीकरणादरम्यान उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, उपनेते बाल्या बोरकर, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, ओसीडब्ल्यूचे केएमपी सिंग, सचिन द्रवेकर यांच्यासह पन्नासावर नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 

81 हजार ग्राहकांपर्यंत 24 तास पाणी 
24 बाय 7 योजना सध्या 16 भागांत राबविण्यात येत असून, 81 हजार ग्राहकांपर्यंत 24 तास पाणीपुरवठा होत असल्याचा दावा या सादरीकरणातून करण्यात आला. शहरात एकूण 676 किमीपैकी 600 किमी अंतराचे जलवाहिनीचे जाळे पसरविण्यात आले आहे. 24 तास पाणीपुरवठ्यासंदर्भात 52.8 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. 

Web Title: Where does 270 MLD water every day