खड्डेमुक्त रस्त्यांसाठी "व्हाईटटॉपिंग' तंत्रज्ञान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नागपूर : सध्या डांबरी रस्त्यांवरील खड्डे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. यावर तोडगा म्हणून रस्त्यांवर कॉंक्रिट व्हाईटटॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य सचिव पी. एल. बोंगीरवार यांनी आज येथे सांगितले. नागपुरात लिबर्टी चौक ते पागलखाना चौकपर्यंतचा रस्ता या तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात येणार आहे. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त असून रस्ते 25 वर्षांपर्यंत उत्तम राहतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

रामदासपेठ येथील एका खासगी हॉटेलमध्ये व्हाईटटॉपिंग तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कॉंक्रिट व्हाईटटॉपिंग रस्ते तयार करण्यासाठी माफक किमतीची यंत्रणा लागत आहे. या रस्त्यांवर देखभाल दुरुस्तीचा खर्च नगण्य आहे. सुरुवातीचा खर्च अधिक असला तरी हे रस्ते टिकाऊ असल्याने दीर्घकालीन देखभाल दुरुस्तीच्या खर्चाच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. या रस्त्यावर खड्डे तयार होत नसल्याने नागरिकांनाही अपघातमुक्त रस्ते मिळतील. सुरुवातीला ग्रामीण भागासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. परंतु, हे तंत्रज्ञान अद्ययावत करण्यात आले असून आता शहरी भागात रिंग रोड आदीही तयार केले जात आहे. पुणे, ठाणे शहरात या तंत्रज्ञानानेच रस्ते तयार करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर बंगळुरूमध्ये दररोज एक हजार वाहनांची वर्दळ असलेला रस्ताही याच तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला आहे. हा रस्ता टणक असल्याने वाहनाला अधिक गती मिळत असून इंधनाचीही बचत होत असल्याचा दावा बोंगीरवार यांनी केला. याशिवाय रात्रीच्या वेळेस रिफ्लेक्‍शन फारच कमी आहे. त्यामुळे रात्रीला वाहनाच्या होणाऱ्या अपघातांवरही नियंत्रण येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Whitetoping" technology for ditch-free roads