अवैध दारूविक्रीला आशीर्वाद कुणाचा? 

file photo
file photo

खापरखेडा (जि. नागपूर) : परिसरात अनेक दिवसांपासून अवैधरीत्या विविध प्रकारच्या दारूविक्रीला उधाण आले आहे. या अवैध दारूविक्रीवर पोलिस नियंत्रण मिळविण्यात यशस्वी ठरत नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. खापरखेड्यासह चनकापूर, भानेगाव, बिना संगम व यांसारख्या ठिकाणी अवैध दारूविक्रेत्यांचे जाळे पसरले असून पोलिस व अबकारी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. 
परिसरातील विविध ठिकाणी दररोज मोहफुलाची दारूविक्री होत असते. या क्षेत्रात तसेच खापरखेडा परिसरात अवैध दारूविक्रीबाबतीत चांगलेच नाव आहे. वास्तविकता खापरखेडा बाजारपेठेचे मुख्य केंद्रस्थान असून नागरिकांची नेहमी येथे वर्दळ असते. ज्यामुळे खापरखेडा म्हणजे "बारखेडा' असेही अनेकजण मत व्यक्त करीत आहेत. येथे बारची संख्या वाढली आहे, शिवाय अवैध देशी दारू, विदेशी, मोहफूल दारूविक्री होत आहे. यावर कोणतीही कारवाई होत नसल्याची चर्चा स्थानिक नागरिक करीत आहेत. परिणामी परिसरातील तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. ज्यामुळे सर्वसामान्य घरातील पालक तणावात आहेत. 
स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीतील अनेक भागात खुल्या पद्धतीने अवैधरीत्या दारू विकली जात आहे. इतकेच नव्हे तर सायंकाळ झाली की या अवैध दारूविक्रेत्यांच्या अड्ड्यांवर दारू पिणाऱ्यांची मोठी वर्दळ सुरू होते. परिसरात विकली जाणारी मोहफूल दारू निकृष्ट दर्जाची आहे. या दारूत भेसळ करण्याकरिता रासायनिक द्रव्याचासुद्धा वापर केला जात असल्याची माहिती आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला अशा भेसळयुक्‍त दारूपासून धोका असून दारूविक्रेते अधिकच्या कमाईसाठी हा सर्व प्रकार करीत असल्याचे तर्क लावला जात आहे. त्यामुळे दारू पिणाऱ्याच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबविणे गरजेचे झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com