कोणी यंत्र घेता का यंत्र?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

अकोला : उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमे अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास चालना देण्याचा निश्चय राज्य शासनाने केला आहे. त्यानुसार शेतीसाठी लागणारी महत्त्वाची यंत्रे, अवजारे घेण्यासाठी कृषी विभागामार्फत 25 ते 60 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

कृषी यंत्रिकीकरणाकरिता विविध योजनांतर्गत जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्षांकाच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. तेव्हा प्रत्येक अवजारासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक असून, ज्या अवजारात जास्तीत जास्त अनुदान देय आहे, त्या एकाच यंत्र/औजारास अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध अर्जाच्या नमुन्यात 30 मे 2018 पर्यंत तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा. जिल्ह्यास प्राप्त आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड तालुका हा घटक मानुन सोडत पद्धतीने करण्यात येईल. तेव्हा इच्छूक शेतकऱ्यांनी संबधितांकडे अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे.

योजनेंतर्गत मिळणारी यंत्रे
ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, मोगडा (कल्टीव्हेटर), सर्व प्रकारचे प्लांटर (खत व बियाणे टोकन यंत्र), मळणी यंत्र, पॉवर विडर, रिपर व रिपर कम बाईंडर, दालमिल व पुरक यंत्र संच (डी-स्टोनर, पॉलीशिंग, ग्रेडींग इत्यादी), कापूस श्रेडर, ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र (बूम स्प्रेअर), मिस्ट ब्लोअर, सबसॉईलर इत्यादी कृषी यंत्र/औजारे घेण्याकरिता कृषी विभागाकडून अनुदान दिले जाणार आहे.

असे राहील अनुदान -
योजनेंतर्गत ट्रॅक्टरकरिता अ.ज., अ.जा., अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी व महिला लाभार्थ्यांसाठी उच्चतम अनुदान मर्यादेत किमतीच्या ३५ टक्के महत्तम सव्वा लाख व इतर लाभार्थ्यांसाठी किमतीच्या २५ टक्के महत्तम एक लाख तसेच योजनेत नमुद औजारांकरिता अ.ज., अ.जा., अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी व महिला लाभार्थ्यांसाठी उच्चतम अनुदान मर्यादेत किमतीच्या ५० टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के अनुदान देय राहील. महत्त्वाचे म्हणजे, ट्रॅक्टर चलित यंत्राकरिता अर्ज करताना अर्जासोबत ट्रॅक्टर असल्याबाबतचा पुरावा (आर.सी.बुक) सादर करणे अनिवार्य आहे.

Web Title: who buy the machines