मुलांना विकणारी 'सपना शूटर' आहे तरी कोण?

प्रमोद काकडे
रविवार, 19 जानेवारी 2020

दीड महिन्यांपूर्वी अशाच एका सौद्याची बोलणी सुरू असताना हरिणायातील युमनानगर येथील "आय एम.ए. ब्लड डोनर' या स्वयंसेवी संस्थेने पीडितेची सुटका केली. तिने हरियाणा पोलिसांना दहा वर्षांपूर्वी चंद्रपुरातून तिला पळवून आणल्याचे सांगितले. चंद्रपूर पोलिसांनी पीडितेला येथे आणले. तिच्या सांगण्यावरून जान्हवी मुजूमदार, गीता मुजूमदार अणि सावित्री रॉय या चंद्रपुरातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

चंद्रपूर : मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी युनिता टाक (वय 52) उर्फ सपना शूटर हिला चंद्रपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हिमाचल प्रदेशातील नाहन येथून शुक्रवारला अटक केली. तिला आठ दिवसांची पोलिस कोठङी मिळाली आहे. सपनाच्या अटकेने मानवी तस्करीतील अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्‍यता आहे. हरियाना आणि हिमाचल प्रदेशातील आणखी दहा ते पंधरा आरोपींच्या शोधात पोलिस आहेत. 

संबंधित इमेज

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरातील कालि माता मंदिरातून चार जून 2010 रोजी दहा वर्षीय मुलीची प्रसादातून गुंगीचे औषध देऊन थेट हरियाणात विक्री करण्यात आली. जान्हवी मुजूमदार या महिलेने या मुलीला बेशुद्धवस्थेत रेल्वेने हरियाणात नेले होते. जान्हवीने तिला हरियाणातील नारायणगढ येथील सपना शूटरच्या ताब्यात दिले. मागील दहा वर्षांत सपनाने या मुलीचे सात लग्न लावून दिले. अनेकांशी तिच्या शरीराचा सौदा केला. या मुलीला अल्पवयातच दोन मुलं झाली. 

काय झालं असावे? - लग्न होऊन झाले सहाच महिने अन्‌ पत्नीने दाखवले 'रूप', मग पतीने घेतला हा निर्णय

दीड महिन्यांपूर्वी अशाच एका सौद्याची बोलणी सुरू असताना हरिणायातील युमनानगर येथील "आय एम.ए. ब्लड डोनर' या स्वयंसेवी संस्थेने पीडितेची सुटका केली. तिने हरियाणा पोलिसांना दहा वर्षांपूर्वी चंद्रपुरातून तिला पळवून आणल्याचे सांगितले. चंद्रपूर पोलिसांनी पीडितेला येथे आणले. तिच्या सांगण्यावरून जान्हवी मुजूमदार, गीता मुजूमदार अणि सावित्री रॉय या चंद्रपुरातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तपासात सपना शुटर मानवी तस्करीतील महत्त्वाचा दुवा असल्याचे तपास समोर आले. 

Image may contain: 1 person, closeup
आरोपी युनिता टाक (वय 52) उर्फ सपना शूटर

पोलिसांशी लपंडाव

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले. हे पथक आठ दिवसांपूर्वी हरियाणाला रवाना झाले. हरियाणातील यमुना नगरमधून आधीच सपनाने पळ काढला होता. त्यानंतर ती चंदीगडला असल्याची माहिती मिळाली. पोलिस तिथेही धडकले. परंतु, तिथूनही सपना पसार झाली होती. चार दिवस पोलिस तिच्या मागावर होते. ती पोलिसांशी लपंडाव खेळत होती. शेवटी हिमाचल प्रदेशातील नाहन येथील तिच्या घरीच ती चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागली.

हेही वाचा - प्रेयसीच्या खूनप्रकरणी शिक्षा; शिक्षा भोगताना तब्येत झाली खराब, मग...

आठ दिवसांची पोलिस कोठडी

याप्रकरणातील आणखी दहा ते पंधरा आरोपींच्या शोधात पोलिस आहेत. सपनाला सुरक्षेच्या कारणामुळे दिल्लीतून विमानाने नागपूरपर्यंत आणले. तिला आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. सपनाने आधी खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगली आहे. युनिता टाक हे तिचे खरे नाव आहे. तिच्यावर हरिणाया आणि हिमाचल प्रदेशातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

संबंधित इमेज

वेगवेगळ्या नावाने ओळख

मानवी तस्करीच्या वर्तुळात सपना शूटर, मंजू आदी नावाने ती ओळखली जाते. आतापर्यंत अटकेतील चंद्रपुरातील तीन महिलांनी वीसच्यावर मुली विकल्याची कबुली दिली आहे. सपनाच्या अटकेने या मुली पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मानवी तस्करीचे रॅकेट उत्तर भारतातील अनेक राज्यांत पोहोचले आहे. सपना मुख्य एजंट म्हणून काम करायची. तिच्या अटकेमुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील मानवी तस्करीची प्रकरणांचा छडा लागण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is a 'sapna shooter' selling children?