झेडपीतून माघार कोण घेणार? शंभर उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी तब्बल शंभर तर पंचायत समितीच्या ३१ जागांवर १५६ उमेदवार रिंगणात आहेत
झेडपीतून माघार कोण घेणार? शंभर उमेदवार रिंगणात
sakal

नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीविषयी संभ्रम दूर झाल्याने आता बंडखोरांच्या माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी तब्बल शंभर तर पंचायत समितीच्या ३१ जागांवर १५६ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी (ता.२७) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे.

झेडपीतून माघार कोण घेणार? शंभर उमेदवार रिंगणात
पुणे : तळजाई टेकडीवरील प्रकल्पास नागरिकांचा विरोध

ओबीसी आरक्षणाशिवाय प्रथमच निवडणूक होत आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर ओबीसी आरक्षण गमावल्याचा आरोप करीत आहे. मात्र सर्वच उमेदवार ओबीसी असल्याने प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा गौण ठरणार आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी असली तरी नागपूरमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. शिवसेनेला एकही जागा सोडण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नकार दिला होता. त्यामुळे सेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेचे नेत खासदार कृपाल तुमाने यांनी माघार घेणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघातील सावरगाव सर्कलमध्ये माजी सभापती सतीश शिंदे यांच्या पत्नीने दावेदारी दाखल केली आहे. त्यांनी माघार घेण्यास आधीच नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना येथे रंगणार आहेत. भाजपचे माजी गटनेते अनिल निदान यांनाही शेवटपर्यंत भाजपने झुलवले होते. त्यामुळे त्यांनी उमेदवारी दाखल करून भाजपसमोर मोठा पेच निर्माण केला. त्यामुळे भाजपच्यावतीने कोणालाच बी फॉर्म दिला नाही.

अनिल निदान आमचे उमेदवार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी जाहीर केले. मात्र निदान यांच्या मतदारसंघात कमळ चिन्ह राहणार नाही. सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने एका मतदारसंघात उमेदवार उभा करून राष्ट्रवादीला धोका दिला होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला आहे.

राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी पोटनिवडणूक गांभीर्याने घेतली आहे. त्यांचे प्रचार दौरेसुद्धा सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटात शांतता आहे. देशमुख नसल्याने दुसऱ्या कुठल्याही नेत्याने अद्याप या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारलेली नाही. याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.

एकूण मतदार :६ लाख १६ हजार १६

पुरुष मतदार : ३ लाख १९ हजार २९२

महिला मतदार : २ लाख ९६ हजार ७२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com