esakal | शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला पोलिसांनी का घेतले ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

अरविंद कात्रटवार

जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अभियंत्याचा पदभार काढून त्यांच्या कार्यकाळातील कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आत्महदहनाचा इशारा देणाऱ्या गडचिरोली येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांना पोलिसांनी मंगळवारी (ता. 25) अटक करून त्यांची सुटका केली.

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला पोलिसांनी का घेतले ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : आपल्याला न्याय मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात आत्मदहन करू, असा इशारा शिवसेना जिल्हा उपप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी निवेदनातून दिला होता. याची दखल घेत पोलिस त्यांच्या मागावर होते. अखेर खबऱ्याच्या माहितीवरून मंगळवारी सकाळी शहरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर दुपारी कात्रटवार यांना पोलिसांनी तालुका न्यायदंडाधिकाऱ्यापुढे हजर केले. यापुढे आपण जीविताला हानी पोहोचणार नाही, अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे कृत्य करणार नाही, अशी लेखी हमी दिल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली.

आत्मदहनाचे निवेदन केले सार्वजनिक

सोमवारी अरविंद कात्रटवार यांनी आत्मदहन करीत असल्याचे निवेदन सार्वजनिक केले होते. त्यामुळे अनेकांच्या नजरा जिल्हा परिषदेतील घडामोडीकडे लागल्या होत्या. अरविंद कात्रटवार यांनी विधानसभा अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आहे की, जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता फाले यांना नियमबाह्य पद्धतीने उपविभागीय अभियंत्याचा पदभार देण्यात आला.

असे का घडले? : माणिकगड कंपनीने लुटली गरीब शेतक-याची शेतजमीन, आता आली भीक मागण्याची वेळ

उपविभागीय अभियंत्यावर कारवाई नाही

त्यांचा प्रभार काढून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या संपूर्ण कामाची चौकशी एका समितीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या निवेदनाचा काहीच परिणाम न झाल्याने कात्रटवार यांनी उपविभागीय अभियंत्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. कात्रटवार सेनेचे निष्ठावंत पदाधिकारी असून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

loading image